– सात दुचाकी १,२५,००० रू. कोळसा १८००० रू असा एकुण १,४३,००० रू. चा मुद्देमाल जप्त
कन्हान :- पोलीस रात्र गस्त करित असताना गोंडेगाव खुली खदान येथुन कोळसा चोरून दुचाकीवर बो-या लादुन नेताना पोलीसानी पकडुन वेकोलि सुरक्षा रक्षक यांचे तक्रारीवरून कन्हान पोलीसानी सात आरोपीना ताब्यात घेत त्यांचे जवळुन सात दुचाकी (मो.सा.) सह दोन हजार शंभर किलो दगडी कोळसा असा एकुण एक लाख तेरेचाळीस हजार रूपयाचा मुद्देमाल जप्त करून दुचाकीने कोळसा चोरी करणा-याना पकडुन मोठी कारवाई करण्यात आली आहे.
शुक्रवार(दि.५) जुन ला कन्हान पोलीस निरिक्षक वैजयंती मंडवधरे या पोलीस कर्मचारी हो.कॉ. जैलाल सहारे,अमित यादव, हरिश सोनभद्रे, पोशि अश्विन गज भिये, मोहित झाडे, पर्णित दहिवले सह रात्र गस्त करित असताना पहाटे सकाळी गोंडेगाव शिवारात काही दुचाकीवर कोळशा भरलेल्या बो-या बांधुन नेताना पोलीसांनी सात इसमासह सात दुचाकी पकडुन वेकोलि गोंडेगाव खुली कोळसा खदान प्रभारी सुरक्षा अधिकारी ओमप्रकाश पाल हयाना माहिती दिल्याने पाल यानी रात्र पाळीत कर्तव्यावर असण्या-या सुरक्षा रक्षक छत्रपाल राजपुत व कुणाल हुलके हयाना पाठविल्याने त्यानी घटनास्थळी पोहचुन विचारपुस केली असता गोंडेगाव खुली कोळसा खदान डम्पींग यार्ड मधुन कोळसा चोरून आणल्याचे सांगितल्याने
आरोपी १) संदीप श्यामराव पेंदोर वय ३२ वर्षे रा. शिवनगर कन्हा न, २) अर्जुन दिनकर मडावी वय ३० वर्षे रा. राय नगर कन्हान, १) पैशन प्रो मो. सा. क्र. एम. एच. ४० एम. १४०१ किंमत १५००० रू. २) शाईन मो.सा.क्र. एम. एच. ३१ इ.टी. ४६६९ कि.१५,००० रू. ६०० किलो दगडी कोळसा कि. ५००० रू. ३) आरोपी संगुलशन भास्कर मेश्राम वय २५ वर्ष, रा. खदान न.०६ ची होन्डा शाईन मो.सा. क्र. एमएच- २७-डीएन ८७०५ किमत २०००० रू. व ४ बोरीमध्ये ३०० किलो दगडी कोळसा किमत २५०० रू. ४) आरोपी वसंता कवडु आंबाडारे वय ४० वर्ष, रा. न्यु गोंडेगाव ची हिरो एचएफ डिलक्स मो.सा.क्र.एमएच ४०-बीएम-९०१३ किमत २०,००० रू व ०४ बोरी मध्ये ३०० किलो दगडी कोळसा किमत २५००रू. असे एकुण ४ आरोपीना पोलीसानी ताब्यात घेत चार मो. सा. किमत ७०,००० रू दगडी कोळसा १२०० किलो कि. १०००० रू असा एकुण ८०,००० रू. चा मुद्देमाल जप्त करून फिर्यादी वेकोलि गोंडेगाव सुरक्ष रक्षक छत्रपाल बहादुर राजपुत वय २८ वर्ष रा. घाटरोहणा यांचे तक्रारीवरून कन्हान पोस्टे ला चार आरोपी विरूध्द कलम ३०३(२) बीएनएस अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला. तसेच वेकोलि गोंडेगाव सुरक्षा रक्षक कुणाल गजानन हुलके वय २९ वर्ष रा. गोंडेगाव कालोनी यांचे तक्रारीवरून आरोपी १) अंकु श बिसनदेव साहनी, वय २३ वर्ष, रा. खदान न.०६, २) रिंकुलाल कश्यप, वय १९ वर्ष, रा. खदान न.०६ ची १) स्प्लेंडर मो.सा. क्र. एमएच-४०-बी – ७११६ किमत २०००० रू. दगडी कोळसा ३०० किलो किमत २५०० रू. २) प्रो मो.सा. क्र. एमएच-४०-बीएन ९५८४ किमत २०००० रू दगडी कोळसा ३०० किलो २५०० रू, ३) आरोपी प्रविण ग्याणीवंत कुकुडे वय ३२ वर्षे रा. धरम नगर पिपरी कन्हान हिरो होंडा स्प्लेंडर मो.सा.क्र. एम. एच. ३१ सी.टी. २७३९ किंमत १५००० रु. ची व तिन बोरी कोळसा ४०० किलो किं. ३००० रु.असे एकुण सात मो. सा. किमत १,२५,००० रू. दगडी कोळसा २१०० किलो किमत १८००० रू. असा एकुण १ लाख ४३ हजार रू. चा मुद्देमाल जप्त करून कन्हान पोलीस पुढील तपास करित आहे.



