नागपूर :- सेव्हन नोट्स एन्टरटेनर्सने प्रस्तुत व्हॉइस ऑफ व्हॉर्टेक्स हा कार्यक्रम जाहीर केला आहे. २० ते ५५ वयोगटा करीता विदर्भ- स्तरीय एकल गायन स्पर्धा, जी लपलेल्या प्रतिभेला वाव देण्यासाठी आणि गायन क्षेत्रात प्रवेशाचा मार्ग खुला करण्यासाठी रचलेली आहे.
वेळापत्रक आणि स्थळे:
-ऑडिशन्स: २० एप्रिल, अमृत भवन
-उपांत्य फेरी: .२४ एप्रिल, अमृत भवन
-ग्रँड फिनाले: ३० एप्रिल, साई सभागृह, नागपूर
सामाजिक हेतू-
आयोजकांचे मिशन बक्षिसां पलीकडे जाते.
१ ले, २ रे आणि ३ रे पारितोषिकां बरोबरच सेव्हन नोट्स पुढील ५० गायकांना भविष्य घडवण्यात आँनलाईन मार्गदर्शनाचे प्रयत्न करेल, तसेच पुढील १२ महिने विदर्भ भर लागोपाठ कार्यक्रमांचे आयोजन केले जाईल, तेव्हा संधी मिळत जाईल. विशेष महणजे चिंतेचा विषय असा की, अनेक स्पर्धेत कलावंत भाग घेतात त्यानंतर बेनामीत जगतात, ज्या भविष्याचा वेध घेत चाचणीत उतरलो असतो त्या नंतर प्रयत्न व संधी घेत गृहस्थाश्रम आणि पोट पाणी साठी कलेपासून दुरावला असतो म्हणून समस्त विदर्भातील संपूर्ण जिल्ह्यातील कला व संगीत क्षेत्रातील कलाकारांसाठी हा असा मंच होऊ पाहतोय जिथून अपेक्षेचे महाद्वार, प्रमाणित कलेचे दालन उघडलेले मिळेल. गायन ही प्रतिभा संगीतातील एक साधना आहे. हे एक अनंत विश्व आहे. समाजासाठी तृप्ती, परिपूर्ण मन भरणारी संजीवनी आहे. उद्योग, व्यापारीकरण या फार नंतरच्या गोष्टी आहेत. उपजत कला, माता सरस्वतीचा आशीर्वाद लाभलेले भाग्यवंत एखादाच असतो, तो कधी ना कधी पटलावर झळकतो पण..जीवनाच्या धकाधकीत काही सुप्त गुणांना वाव मिळणे हि साधी संकल्पना आमची आहे. समस्त वैदर्भीयांनी जरूर यावे आम्हास भरभरून आशीर्वाद द्यावा जेणेकरून भविष्यात संपूर्ण विदर्भासाठी काम करण्यास प्रेरणा मिळत राहील. कलावंतांनी सुद्धा भाग घेऊन आपल्याच गायन कार्यक्रमांचा मान वाढवावा.
सहभाग-
नोंदणी फी: ₹१०००/-. गायकांनी QR कोड स्कॅन करून गुगल फॉर्म भरावा, आनलाईन भरावेत आणि दैनंदिन अपडेट्स, रिहर्सल मार्गदर्शक तत्त्वे आणि गायन टिपांसाठी WhatsApp ग्रुपमध्ये सामील व्हावे.
पारितोषिके-
विजेता: ₹ ३०,०००
१ ला उपविजेता: ₹२०,०००
२ रा उपविजेता: ₹१०,०००
२ आयोजकांच्या पसंती नुसार
₹ ५,०००/- आणि
५ उत्तेजनार्थ ₹ २,०००/-
याशिवाय: पहिल्या तीन विजेत्यांना अल्बममध्ये ४ गाणी गाण्याची संधी आणि काही सरप्राइजेज सुद्धा.
सेलिब्रिटी पाहुणे-
इंडियन आयडॉल फेम उत्कर्ष वानखेडे आणि अनन्या पाल ग्रँड फिनालेला उपस्थित राहतील.
प्रेस मिटचे अध्यक्ष-
ही बैठक इम्रान राही, प्रसिद्ध गझलकार, लेखक यांच्या अध्यक्षतेखाली, किरण फुलझेले (समाजसेवक), आयोजक अविनाश दुपारे (निर्देशक) आणि संदीप निसाळ (सहाय्यक निर्देशक) भुषण दुपारे, पालेकर, रोशनी साखरे, यांच्या उपस्थितीत झाली. या उपक्रमाला चित्रपट कलाकार, टीव्ही कलाकार, निर्माते, दिग्दर्शक, AWIWA चे अध्यक्ष, संगीतप्रेमी आणि विदर्भभरातील प्रतिष्ठित नागरिकांचा पाठिंबा आहे.
व्हॉइस ऑफ व्हॉर्टेक्सचे उद्दिष्ट विदर्भातील आवाज शोधणे आणि त्यांना वर्षभर मंच देऊन टिकवून ठेवणे हे आहे.








