किशोर साहू, मौदा :- कोदामेंढी येथील वार्ड क्रमांक 1 स्थित पाण्याच्या टाकीजवळ जीर्ण झालेली पाईपलाईन फुटल्याने व ती आज दिवसभर दुरुस्ती चे कार्य करूनही दुरुस्त न झाल्याने पुढील दोन ते तीन दिवस नळ योजना बंद राहणार असल्याचे आज सायंकाळ दरम्यान भ्रमणध्वनीवरून ग्रामपंचायत नळयोजनेचे कर्मचारी चंद्रभान बारई यांनी सांगितल्याने . वर्षभरापूर्वीपासून नियमित पाणीपुरवठा झालेल्या कोदामेंढीत ऐन तीव्र उन्हाळ्यात भीषण जलसंकट निर्माण झालेले आहे.
दोन दिवसापासूनच जीर्ण झालेले पाईपलाईन फुटायला सुरुवात झालेली होती. वार्ड क्रमांक एक व वार्ड क्रमांक दोन मधील काही भागांमध्ये दोन दिवसापासूनच पाणीपुरवठा अनियमित झालेला होता. मात्र ती पाईपलाईन आता पूर्ण फुटलेली आहे. असे भ्रमणध्वनी वरून साईबाबा पतसंस्थेचे संचालक व गावातील सामाजिक कार्यकर्ते सुभाष बावनकुळे यांनी भ्रमणध्वनी वरून सांगितले . ऐन तीव्र उन्हाळ्यात पाण्याची अत्यंत गरज असताना गावात भीषण जलसंकट निर्माण झाल्याने वरिष्ठ प्रशासन विभागाने विशेष लक्ष देऊन कोदामेंढी येथील पाणीपुरवठा नियमित करावा, अशी मागणी सुभाष बावनकुळे सह समस्त ग्रामवासीयांनी केली आहे.