किशोर साहू, मौदा :- बुधवार (ता. 13 मे)ला भारतीय जनता पार्टी कार्यालय महाल नागपूर येथे माजी जि प सदस्य कैलास बरबटे यांची नागपूर जिल्हा रामटेक ( ग्रामीण) उपाध्यक्ष पदी नियुक्ती पत्र देऊन नियुक्ती केली. याप्रसंगी पक्ष संघटना मजबूत करण्याकरिता मी सतत प्रयत्न करील असे आश्वासन बरबटे यांनी नेत्यांना दिले.
याप्रसंगी कार्यक्रमाला आनंदराव राऊत भाजपा जिल्हा अध्यक्ष, राजीव पोतदार प्रभारी रामटेक विधानसभा, टेकचंद सावरकर माजी आमदार, अरविंद गजभिये माजी अध्यक्ष, सुधाकर कोहळे माजी अध्यक्ष, अनिल निधान महामंत्री नागपूर जिल्हा, राहुल किरपान महामंत्री, अजय बोढारे महामंत्री, रिंकेश चवरे महामंत्री, शुभांगी गायधने महामंत्री, नरेश मोटघरे सचिव नागपूर जिल्हा,राजेश ठाकरे अध्यक्ष किसान आघाडी,सुभाष गुजरकर माजी जी प सदस्य, प्रमिला दंडारे माजी जि प सदस्य, ज्योती कोल्हेपारा, परमानंद दंडारे, कमलेश महादुले, अजय वाघमारे, मनोज देशमुख सह सर्व तालुक्यातील मंडळ अध्यक्ष, महामंत्री व भारतीय जनता पक्षाचे नेते व कार्यकर्ते उपस्थित होते.