spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शाहु-फुले-आंबेडकर पुरस्कार ओगावा सोसायटीला प्रदान..

ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी व्यक्त केली कृतज्ञता.

संदीप कांबळे, विशेष प्रतिनिधी

कामठी ता प्र 11:- महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहास्य विभागाच्या वतीने राज्यस्तरीय शाहु-फुले-आंबेडकर पारितोषिके करिता कामठीच्या ओगावा सोसायटीची निवड करण्यात आली होती. त्यानुसार हा पुरस्कार ओभावा सोसायटीच्या अध्यक्षा ॲड. सुलेखाताई कुंभारे यांना मुंबई येथे मंगळवार दि. १० जुन २०२५ रोजी पार पडलेल्या सोहळ्यात मुख्यमंत्री मा. देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री मा. एकनाथजी शिंद, सामाजिक न्याय व विशेष सहास्य मंत्री मा. संजय सिरसाट, संजय राठोड यांच्या प्रमुख उपस्थितीत सन्मानाने प्रदान करण्यात आला.

सन १९९६ मध्ये ओगावा सोसायटीची स्थापना गाजी राज्यमंत्री ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी केली होती. जपान येथील नोरीको ओगावा यांच्या कार्याचा ॲड. सुलेखाताई कुंभारे यांच्यावर प्रचंड मोठा प्रभाव आहे. त्यांच्याव आशीर्वादाने आपण कामठीत जगविख्यात ड्रॅगन पॅलेस टेम्पल उभारू शकलो, अशीही कृतज्ञता ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी पुरस्कार सोहळ्यानंतर व्यक्त केली आहे.

ओगावा सोसायटीने विश्वविख्यात ड्रॅगन पॅलेसची निर्मिती केली, ड्रॅगन पॅलेस हे शांती, मैत्री व मानव कल्याणकारी विचाराचे केंद्र म्हणुन जगप्रसिध्द आहे तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक व संशोधन केंद्र ड्रॅगन पॅलेस विपश्यना मेडीटेशन सेंटर पाहुन तत्कालीन राष्ट्रपती डॉ. रामनाथ कोविंद, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही प्रशंसा केली होती. दरम्यान, ओगावा सोसायटीतर्फे ड्रैगन इंटरनॅशनल स्कुल, दादासाहेब कुंभारे बहुउद्देशीय प्रशिक्षक्षण केंद्राची निर्मिती केली आहे. ओगावा सोसायटीद्वारे वर्षभर अनेक शैक्षणिक, सांस्कृतिक कार्यक्रम राबविल्या जातात, ॲड. सुलेखाताई कुंभारे यांच्या नेतृत्वात ओगावा सोसायटी पूर्णपणे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या चळवळीला समर्पित आहे ओगावा सोसायटीच्या कार्याची दखल घेत शाहु-फुले-आंबेडकर पुरस्कार देण्याचा निर्णय सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग मंत्रालयाने घेतला याबद्दल ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि संबंधित विभागाचे आभार मानले आहेत. दरम्यान, माझी आई नलीनीताई नारायणराव कुंभारे यांनी मला जे पाठवळ दिले त्यामुळेच आपण अनेक समाजोपयोगी उपक्रम प्रत्यक्षात आणु शकले हा पुरस्कार भी आई नलीनी, वडील दादासाहेब कुंभारे आणि नोरीको ओगावा यांना समर्पित करीत असल्याचीही कृतज्ञता ॲड. सुलेखाताई कुंभारे यांनी व्यक्त केली आहे.

Popular Articles