केळापूर :- क्रांतिवीर शामा कोलाम यांची जयंती यावर्षी नाचून-गाऊन साजरी न करता, कोलाम समाजाच्या प्रलंबित आणि गंभीर समस्या शासन आणि प्रशासनाच्या दरबारी मांडून (वाचून) साजरी केली जाणार आहे. या प्रलंबित मागण्यांकडे सरकारचे लक्ष वेधण्यासाठी येत्या १ ऑगस्ट २०२६ रोजी ‘जगदंबा संस्थान केळापूर’ ते ‘उपविभागीय अधिकारी कार्यालय केळापूर’ दरम्यान एक भव्य लक्षवेधी रॅली काढण्यात येणार आहे. या संदर्भातील रीतसर निवेदन उपविभागीय अधिकारी कार्यालय आणि केळापूर पोलीस स्टेशनला सादर करण्यात आले असल्याची माहिती शामा कोलाम ब्रिगेडचे युवा नेते आकाश आत्राम यांनी दिली आहे.
ही रॅली शामा दादा कोलाम ब्रिगेडच्या प्रदेश अध्यक्षा इंदिरा बोंदरे यांच्या खंबीर नेतृत्वाखाली काढण्यात येणार असून, यामध्ये संपूर्ण जिल्ह्यातून हजारो कोलाम बांधव आणि महिला मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत.
नाचून नाही तर हक्क मागून अभिवादन!
निवेदन सादर करताना युवा नेते आकाश अत्राम म्हणाले की, शामा दादा कोलाम यांनी आयुष्यभर अन्यायाविरुद्ध आणि शोषणाविरुद्ध बंड पुकारून कोलाम समाजाची पाठराखण केली. त्यामुळे त्यांच्या जयंतीला फक्त नाचून-गाऊन अभिवादन करणे हे त्यांच्या विचारांना अभिप्रेत ठरणार नाही. देशाच्या स्वातंत्र्याला ७५ वर्षांपेक्षा जास्त काळ उलटूनही आजही मूळ रहिवासी असलेल्या कोलाम जमातीला राहण्यासाठी स्वतःच्या हक्काचे घर नाही आणि जगण्याचे कोणतेही हक्काचे साधन नाही.
मांगुर्डा कोलाम पोडचे जिवंत उदाहरण शासकिय अनास्थेच्या जिवंत उदाहरण म्हणजे मांगुर्डा येथील कोलाम पोड आहे येथील कोलाम बांधवांना आजही हक्काचे घरे मिळालेली नाहीत ज्यांच्या कडे घर आहे ती त्यांच्या नावावर झालेली नाहीत एका बाजूला शासकिय प्रकल्प कार्यालय शामादादा च्या नावावर जयंतीनिमित्त लाखो रुपयांचा खर्च करते, मात्र दुसऱ्या बाजूला प्रत्यक्ष शामादादांच्या जमातीतील गरीब लोकांना मात्र प्रशासनाकडून कवडीचीही किंमत दिली जात नाही अशी तीव्र खंत सौ इंदिरा बोंदरे आणि आकाश आत्राम यांनी व्यक्त केली या सर्व अन्यायाचा जाब विचारण्यासाठी आणि कोलाम समाजाला त्यांचे मूलभूत हक्क मिळवून देण्यासाठी दिणांक १ ऑगस्ट २०२६ रोजी शामादादा च्या जयंती निम्मित होणाऱ्या एतिहासिक लक्षवेधी रैली मध्ये सर्व कोलाम बांधवांनी आणि समाजबांधवांनी मोठ्या संख्येने सहभागी राहावे असे आव्हान आकाश आत्राम, रामचंद्र आत्राम, सुरेश आत्राम झरी जामनी तालुक्यातून तांनबा टेकाम रमेश कोडवते आनंद कुमरे यांनी केले.





