spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

शिवसेना शहरप्रमुख अतिष चव्हाण यांचा विश्वास…..लाडक्या बहिणी आम्हालाच मतदान करणार

पांढरकवडा :- नगर परिषद निवडणूक २०२५ च्या पार्भूमीवर पांढरकवडा शहरात राजकीय वातावरण चांगलेच तापले असून आता फक्त प्रचाराचा १ दिवसच उरला आहे अश्यातच नगराध्यक्ष पदासाठी शिवसेना शिंदे पक्षाचे उमेदवार डॉ अभिनय नहाते हे १०० % विजयी होणार असे मत शिवसेना शिंदे गटाचे शहरप्रमुख अतिष चव्हाण यांनी आमच्या प्रतिनिधी कडे व्यक्त केले…. आतिष चव्हाण म्हणाले की आमचे नेते उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब यांनी प्रथमच मुख्यमंत्री असतांना महाराष्ट्रामध्ये लाडकी बहीण योजना सुरु केली तसेच जून २०२६ मध्ये शेतक्यांना कर्जमाफी सुद्धा देण्याचे त्यांनी स्पष्ट केले व शिवसेना शिंदे गटाचे मंत्री उदय सामंत यांच्या कड़े उद्योग खाते असल्यामुळे पांढरकवड्यातील रोजगाराचा प्रश्न शिवसेना शिंदे गट सोडवू शकतो तसेच स्वता उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब नगरविकास खात्याचे मंत्री असल्यामुळे शहराचा विकास करण्याकरिता सोयीचे होणार आहे. म्हणून नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ अभिनय नहाते यांना मतदारांनी मतदान करावे. तसेच पांढरकवडा येथील शिवसेनेच्या नगराध्यक्ष सह सर्व नगरसेवकांना मतदारांनी त्यांचे अमूल्य मत देऊन प्रचंड बहुमतांनी विजयी करावे असे आव्हानं विनंती शिवसेना शहरप्रमुख अतिष चव्हाण यांनी मतदारांना केले.

Popular Articles