नागपूर :- सतरंजीपूरा झोन अंतर्गत मेहंदीबाग रोड, विद्युत विभागासमोरील निवासी परिसरात बेकायदेशीररीत्या कचरा टाकण्यात येत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी शिवसेना (शिंदे गट) तर्फे आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. युवा सेना जिल्हा प्रमुख शरद सरोदे यांनी नागपूर महानगरपालिका आयुक्तांकडे तात्काळ कारवाईची मागणी करणारे निवेदन सादर केले आहे. निवेदनानुसार, संबंधित ठिकाणी नियमितपणे कचरा साठवला जात असून त्यामुळे परिसरात तीव्र दुर्गंधी पसरत आहे. कचऱ्यामुळे डास व किटकांचे प्रमाण वाढले असून स्थानिक नागरिकांच्या आरोग्यास धोका निर्माण झाला आहे. हा प्रकार निवासी भागात सुरू असल्याने नागरिकांमध्ये तीव्र संताप व्यक्त होत आहे. सरोदे यांनी म्हटले आहे की, हा प्रकार Solid Waste Management Rules, 2016 तसेच Environment (Protection) Act, 1986 मधील तरतुदींचे उल्लंघन करणारा आहे. त्यामुळे संबंधित अधिकारी व जबाबदार व्यक्तींवर विभागीय चौकशी करून कठोर कायदेशीर कारवाई करावी, अशी मागणी करण्यात आली आहे. तसेच संबंधित ठिकाणाची तातडीने पाहणी करून कचरा हटविण्याची कार्यवाही करावी, अन्यथा आंदोलन छेडण्यात येईल व पुढील कायदेशीर पावले उचलण्यात येतील, असा इशाराही देण्यात आला आहे. दरम्यान, या प्रकारामुळे परिसरातील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून प्रशासनाने त्वरित दखल घ्यावी, अशी मागणी जोर धरत आहे. युवा सेना जिल्हाप्रमुख शरद सरोदे यांच्या नेतृत्वाखाली निवेदन सादर करण्यात आले. यावेळी सहसंपर्क प्रमुक ओंकार पारवे, महिला जिल्हाप्रमुख मनीषा पापडकर, उपजिल्हा संघटिका गायत्री वैद्य, खेमचंद कैथल, पुनम चाडगे, मनीषा पराड, मोना शेंडे, चंद्रकला पटले, रक्षा शर्मा, मालती राना,मंदा कुकडे, लता गावंडे, पूनम हरवडे, किरण कांबळे, खेमचंद केथले, शिवराम वाढवे, अरविंद राणे, मयूर रामटेके, प्रवीण रामटेके, अल्पेश ठवरे, संजय रामटेके, समीर गुप्ता, राज ठाकरे, संतोष यादव, लकी मिश्रा सह उपस्थित होते.
सतरंजीपूरा झोनमध्ये निवासी भागात बेकायदेशीर कचरा टाकण्या विरोधात शिवसेनेचा (शिंदे गट) आंदोलनाचा इशारा


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.



