– शायना एन. सी. यांच्यावर गुन्हा दाखल करून अटकेची मागणी; जिल्हाधिकारी कार्यालय चौकात जोरदार घोषणाबाजी
हंसराज, भंडारा :- मुंबई येथील एका कार्यक्रमादरम्यान शिवसेना (शिंदे गट) प्रवक्त्या शायना एन. सी. यांच्याकडून कोट्यवधी शिवसैनिकांचे व हिंदूंचे श्रद्धास्थान असलेले वंदनीय शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे छायाचित्र फाडण्यात आल्याचा आरोप करत, या घटनेच्या निषेधार्थ भंडारा जिल्हा शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाच्या वतीने आज भंडारा येथील जिल्हाधिकारी कार्यालय चौकात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले.
बाळासाहेब ठाकरे यांचा अवमान केल्याप्रकरणी शायना एन. सी. यांच्यावर तात्काळ गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात यावी, अशी मागणी आंदोलकांनी राज्य सरकारकडे केली आहे.
या आंदोलनादरम्यान शिवसैनिकांनी जोरदार घोषणाबाजी करत आपला संताप व्यक्त केला.
“शायना एन. सी. मुर्दाबाद”, “शिवसेनाप्रमुखांचा विजय असो” तसेच “या शायना एन. सी. चे करायचे काय, खाली डोके वरती पाय” अशा घोषणांनी परिसर दणाणून सोडण्यात आला. यावेळी संतप्त कार्यकर्त्यांनी शायना एन. सी. यांच्या छायाचित्राला चपला-जोड्यांनी मारहाण करत ते फाडून तीव्र निषेध नोंदवला.
शिवसेना जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या या निषेध आंदोलनात जिल्हा समन्वयक सुधाकर कारेमोरे, युवासेना जिल्हा अधिकारी श्रीकांत मेश्राम, उपजिल्हाप्रमुख किशोर तलमले, किशोर चन्ने, प्रकाश पारधी, तालुकाप्रमुख तिलक सार्वे, प्रमोद मेश्राम, दिनेश नंदपुरे, विनोद ढोरे, ईश्वर भोयर, ज्ञानेश्वर बावनकर, प्रवीण गायधने आणि शहर प्रमुख राकेश आग्रे हे प्रमुख पदाधिकारी सहभागी झाले होते.
तसेच यावेळी मयूर जोशी, प्रशांत देशमुख, प्रवीण गुप्ता, गुणू राऊत, विनायक सरोदे, प्रकाश गभने, हर्षल टेंभुरकर, भास्कर बेदरकर, दलिराम भुते, रसिक खोब्रागडे, हिमांशू भाजीपाले, धर्मेंद्र ढोमणे, अमित हटवार, राज वधवानी, संतोष चांदेवार, अतुल मिरासे, शामराव मालखंडाळे, संजय झंजाळ, नरेंद्र नान्हे, सोमेश्वर सेलोकर, विलास बुरडे, सुनील सोमनाथे, अरविंद भुरे, शेखर वाघमारे, राजेश नान्हे, गुलचंद धुळसे, सचिन ठवकर, होमराज उपरीकर, निवृत्ती गभणे, शैलेश खोब्रागडे, हनुमान शेंडे, देवानंद निमजे, यश पारधी, विश्वजीत पांडा, संकेत कोसरे, ज्ञानेश्वर बारस्कर, सकास समरीत, पितांबर खंडाते, प्रवेश बनसोड, विशाल भुरे, कुंदन मलेवार, जयदेव होपणमुडे, योगराज कायदे यांच्यासह मोठ्या संख्येने शिवसेना पदाधिकारी व शिवसैनिक उपस्थित होते.






