किशोर साहू, मौदा :- तांडा येथे दरवर्षीप्रमाणे यंदाही श्री.संत शिरोमणी गोरोबा काका पुण्यतिथी उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्त गावात रामधुम काढण्यात आली व गोपालकाला करण्यात आला. त्यात गावातील कुंभार समाजातील लोक व गावातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहून या गोपालकाल्याचा आनंद द्विगुणित केला.
याप्रसंगी ह.भ.प.श्री.हरिओम पटले महाराज,विनोद गभणे सरपंच ग्रा पं तांडा,राजेंद्र खांदारे उपसरपंच ग्रा पं तांडा, गंगाधर डोरले तंटामुक्ती अध्यक्ष तांडा, पंकज पाठक ,सेवकराम वालदे, विनोद पाठक, अल्का पाठक सदस्य ग्रा पं तांडा, दामोधर वालदे माजी उपसरपंच ग्रा पं तांडा,दिनेश खांदारे सूरजमल वरवाडे, शिवशंकर डोरले,राकेश खांदारे सह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी आयोजक श्री.संत शिरोमणी गोरोबा काका उत्सव समिती तांडा च्या सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.








