– सेवा सर्वदा बहुदेशीय संस्था आयोजित -“स्लम महोत्सव २०२५”
नागपूर :- सेवा सर्वदा बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने स्लम महोत्सव ९ नोव्हेंबर ला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि राज्यमंत्री आशिष जयस्वाल यांच्या नेतृत्वाखाली सामाजिक एकात्मता वृद्धिंगत करण्यासाठी आणि झोपडपट्टी भागातील प्रतिभावान मुलांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी सेवा सर्वदा बहुदेशीय संस्था तर्फे “स्लम महोत्सव 2025” चे आयोजन करण्यात आले आहे. हा महोत्सव आपल्या ५ व्या वर्षात पदार्पण करत असून, रहाटे नगर, रहाटे नगर टोली, रामटेके नगर, जोगी नगर, भीम नगर, जयताळा, कैकाडे नगर, मदारी वस्ती आणि सिद्धेश्वरी गोंड वस्ती येथील मुले यात सहभाग घेणार आहेत. विविध देशी खेळांच्या क्रीडा स्पर्धा त्या त्या वस्त्यांमध्येच पार पडणार आहेत. या कार्यक्रमात सांस्कृतिक सादरीकरण तसेच सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला आहे. क्रीडा क्षेत्रान उल्लेखनीय योगदान दिल्याबद्दल प्रशिक्षक रवींद्र टोंग आणि सुरज अग्रवाल यांचा गौरव करण्यात येणार आहे. तसेच सामाजिक बांधिलकीच्या कार्यासाठी सौ.मधुरा गडकरी यांचा विशेष सत्कार करण्यात येईल. उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांनाही या वेळी सन्मानित करण्यात येणार आहे. “स्लम महोत्सव 2025” हा नागपूर शहरातील झोपडपट्टी भागातील मुलांमध्ये आत्मविश्वास, संघभावना आणि सामाजिक सहभाग यांचे मूल्य रुजविणारा एक प्रेरणादायी उपक्रम ठरणार आहे. हा कार्यक्रमा ९ नोव्हेंबर रोजी सायंकाळी ५ ते ९ या वेळेत सिद्धेश्वरी गोंड वस्ती, नागपूर येथे होणार आहे. यावेळी संदीप तुंडुरवार, माधुरी सराडकर, नितीन पाटील, रोशनी कोल्हे यांची उपस्थिती होती.




