spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जिल्हा परिषद आदर्श शाळा घोटमुंढरी येथे स्वतंत्रता दिवसानिमित्त सामाजिक कार्यकर्त्यांकडून शालेय साहित्याचे वाटप

किशोर साहू, मौदा :- 15 ऑगस्ट 2026 रोजीस्वातंत्र्य दिनाच्या शुभ पर्वावर ग्रामपंचायत कार्यालय व शाळेत मान्यवरांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.

गोरक्षनाथ मडावी तंटामुक्ती अध्यक्ष घोटमुंढरी यांनी जवाहर नवोदय विद्यालय प्रवेश परीक्षा साठी बसलेल्या पाचवीच्या विद्यार्थ्यांना त्या परीक्षेची तयारी करण्यासाठी व नवोदय चे मार्गदर्शक पुस्तके विद्यार्थ्यांना मोफत वाटप केले.

त्यासाठी त्यांचे आभार,अभिनंदन शाळा, ग्रामपंचायत व समस्त गावकरी यांच्या वतीने व्यक्त करण्यात आले. घोटमुंढरी येथील आदर्श जिल्हा परिषद शाळा विविध उपक्रमाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांचे सर्वांगिक विकास कसे होईल व गुणवत्ता याबाबतीत तालुक्यात प्रत्येक क्षेत्रात झेप घेत असते.

येथील शाळेची कायापालट होऊन इथे विद्यार्थ्यांसाठी तंत्रज्ञानाच्या शैक्षणिक विविध सोयी सुविधा , सुसज्ज इमारती, AI लॅब, ICT लॅब,सायन्स लॅब,स्मार्ट बोर्ड,वायफाय कनेक्शन,ऑनलाइन स्पर्धा परीक्षा चे शिक्षण उपलब्ध आहेत.

ज्युनियर IAS परीक्षेत पाच विद्यार्थी पास होऊन गोल्ड मेडलिस्ट ठरले त्यांचे सुद्धा पारितोषिक देऊन मान्यवरांचे हस्ते स्वागत,सत्कार करण्यात आले.तसेच विद्यार्थ्यांनी विविध कला कौशल्य यांचे प्रदर्शन करून सर्वांचे मन आकर्षित केले.

कार्यक्रमाला गट ग्रामपंचायत सरपंच चंदा गेडाम व सर्व सदस्य,शाळा समिती अध्यक्ष उदय पांडे ,उपाध्यक्ष मंगलसिंग देवतारे व सर्व सदस्य, माजी विद्यार्थी संघाचे अध्यक्ष निशांत उईकें, उपाध्यक्ष रोशन देवतारे,सर्व सदस्य,तंटामुक्ती अध्यक्ष गोरक्षनाथ मडावी,मुख्याध्यापक विकास धारगावे ,शाळेतील व कॉन्व्हेन्ट चे सर्व शिक्षक वृंद,कर्मचारी,जेष्ठ मान्यवर,आजी माजी सर्व पदाधिकारी, सामाजिक, शैक्षणिक कार्य करणारे व्यक्तिमत्व मान्यवर उपस्थित होते. या मान्यवरांच्या हस्ते सर्व बक्षीस वितरण करण्यात आले.

याचप्रकारे शाळेला सहकार्य करून सर्वांनी शाळा व गावाचे नाव आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगिक विकास करण्यासाठी असेच तत्परतेने पुढाकार घेऊन पुढे यावे व आम्ही शैक्षणिक बाबतीत विद्यार्थ्यांना प्रगतीकडे नेण्यासाठी वाटेल ते प्रयत्न करू,विविध क्षेत्रात त्यांनी यश मिळवावे यासाठी कटिबद्ध राहून कार्य करून विद्यार्थी घडवण्याचे सर्व मिळून कार्य करूअसे मनोगत याप्रसंगी मुख्याध्यापक यांनी व्यक्त केले.

Popular Articles