spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त महाआरोग्य शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद

– पश्चिम, दक्षिण-पश्चिम व दक्षिण नागपुरातील स्कॅनिंग कॅम्पमध्ये नागरिकांची मोठी उपस्थिती

नागपूर :- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित महाआरोग्य शिबिराअंतर्गत पश्चिम नागपूर, दक्षिण-पश्चिम नागपूर आणि दक्षिण नागपूर विधानसभा मतदारसंघात सुरू असलेल्या स्कॅनिंग कॅम्पला नागरिकांचा दिवसेंदिवस उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत आहे. जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि दक्षिण नागपूरचे आमदार मोहन माते यांच्या मार्गदर्शनाखाली माजी आमदार तथा माजी महापौर संदीप जोशी यांच्या संयोजनाखाली राबविण्यात येत असलेल्या या उपक्रमातून नागरिकांना मोफत आरोग्य तपासणी, विविध वैद्यकीय चाचण्या, तज्ज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन तसेच पुढील उपचारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

आज पश्चिम नागपुरातील हनुमान मंदिर (योगेंद्र नगर) आणि याराना लॉन (गिट्टीखदान), दक्षिण-पश्चिम नागपुरातील समाज भवन, दत्त मंदिरासमोर (चिचभवन) व मनपा सभागृह, हनुमान मंदिर (वर्मा लेआऊट) तसेच दक्षिण नागपुरातील पवार सभागृह (कुकडे लेआऊट), अमर नगर समाज भवन (अमर नगर), जयमाता शाळा (जिजामाता नगर), हनुमान मंदिर समाज भवन (गणेश नगर), केसरीया सभागृह (उदय नगर रोड) आणि संत सावता सहकारी बँक (भांडे प्लॉट) येथे आयोजित स्कॅनिंग कॅम्पमध्ये मोठ्या संख्येने नागरिकांनी विविध वैद्यकीय तपासण्यांचा लाभ घेत आपल्या आरोग्याची खात्री करून घेतली.

स्कॅनिंग कॅम्पमध्ये तपासणी झालेल्या आणि पुढील उपचार अथवा शस्त्रक्रियेची आवश्यकता असलेल्या रुग्णांची अधिक सखोल निदानासाठी आवश्यक वैद्यकीय प्रक्रिया वेगाने पूर्ण करण्यात येत असून त्यांना पुढील उपचारांसाठी आवश्यक मार्गदर्शन व सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत.

दि. १३ जुलै रोजी दक्षिण-पश्चिम नागपुरातील हनुमान मंदिर / अग्रसेन भवन (तेलंगखेडी) तसेच दक्षिण नागपुरातील योगभवन (महालक्ष्मी नगर), गजानन महाराज मंदिर (बालाजी नगर), सार्वजनिक हनुमान मंदिर, विरंगुळा केंद्र (वैभव नगर), अब्दुल कलाम लायब्ररी (सोमवारी क्वार्टर) आणि सिद्धेश्वर सभागृह (मानेवाडा रोड) येथे स्कॅनिंग कॅम्प आयोजित करण्यात आला आहे. पश्चिम नागपुरात उद्या कोणताही स्कॅनिंग कॅम्प आयोजित करण्यात आलेला नाही.

महाआरोग्य शिबिराच्या यशस्वी आयोजनासाठी संयोजक संदीप जोशी, सहसंयोजक रितेश गावंडे, विनोद कन्हेरे व रितेश पांडे यांच्यासह मंडळ अध्यक्ष प्रा. दिलीप दिवे (सुभाष नगर), महेंद्र भुगावकर (नरेंद्र नगर), ईश्वर ढेंगळे (त्रिमूर्तीनगर), विनोद शिंदे (धंतोली), विनय दाणी (धरमपेठ), विनोद बघेल (सुरेंद्रगड), अमर खोडे (झिंगाबाई टाकळी), शशांक खेकरे (जानकी मंडळ), किरण दातीर (हनुमान मंडळ) आणि प्रकाश यादव (अयोध्या मंडळ) तसेच सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, डॉक्टर, वैद्यकीय कर्मचारी आणि स्वयंसेवक विशेष परिश्रम घेत आहेत.

महाआरोग्य शिबिराअंतर्गत हे स्कॅनिंग कॅम्प १५ जुलैपर्यंत सुरू राहणार असून या मोफत आरोग्य उपक्रमाचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन संयोजक संदीप जोशी तसेच सहसंयोजक रितेश गावंडे, विनोद कन्हेरे आणि रितेश पांडे यांनी केले आहे.

Popular Articles