spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

एक पेड जगद्गुरुश्री के नाम उपक्रम अंतर्गत घोगुलधरा येथे वृक्षारोपण…

यवतमाळ :- परम श्रद्धेय जगद्गुरु श्री स्वामी रामानंदाचार्य नरेंद्राचार्य व परमपूज्य कानिफनाथ महाराज यांच्या कृपा आशिर्वादाने रामानंद संप्रदाय जिल्हा सेवा समिती यवतमाळ (पूर्व) मधील मारेगाव तालुक्यातील माई फॉर्म हाऊस घोगुलधरा येथे सुमारे २१५ आंब्याच्या वृक्षांची लागवड करण्यात आली. हा कार्यक्रम अत्यंत आनंदी वातावरणात कार्यक्रम पार पडला. एक पेड जगद्गुरुश्री के नाम या उपक्रम अंतर्गत हे वृक्षारोपण करण्यात आले. जगद्गुरु श्री स्वामी रामानंदाचार्य नरेंद्राचार्य यांनी रोज होणाऱ्या आध्यात्मिक शाळेत पर्यावरणासंबंधी वृक्ष लागवडीचे महत्त्व पटवून दिले होते. वातावरणाच्या या लहरीपणाला आपली मानव जातीच जबाबदार आहे. भूतलावरील वृक्षांच्या कत्तली आपणच केल्या असल्याने वातावरणाचा कोप आपल्यालाच सहन करावा लागत आहे. त्यासाठी मोठ्या प्रमाणात वृक्ष लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले होते. त्यांच्या निर्देशानुसार जिल्हाभरात वृक्ष लागवडीचा उपक्रम राबविण्यात येत आहे. तालुका सेवा समिती मारेगाव जिल्हा सेवा समिती यवतमाळ पूर्व च्या वतीने २१५ आंब्यांच्या वृक्षांची लागवड करून त्यांचे संगोपन करण्याचे ठरविण्यात आले. यावेळी माजी जिल्हाध्यक्ष कैलास डोंगरकर, सेवेकरी दुष्यंत निब्रड, मारोती खापने, गणेश उपरे, दामोदर दगडे, पोर्णिमा दगडे, यशोदा वाघाडे, स्वप्नील गौरकार, मनोज मांडवकर, विजय आसेकर, प्रकाश राऊत, दिनकर नेहारे, शकुंतला केराम, मंगला कोरांगे, सुमित्रा आसेकर, उषा नेहारे, मंदा राऊत, शारदा डोंगरकर आदींनी हा उपक्रम पण पूर्ण करून माऊली चरणी आपला सेवा भाव अर्पण केला. वृक्षारोपण कार्यक्रमात सहभागी गुरुबंधू भगिनीचे कार्याची प्रशंशा जिल्हा सेवा अध्यक्ष विनायक सवाई महिला अध्यक्ष अर्चना क्रिष्णापूरे कर्नल भारती धामणकर तसेच जिल्हा सेवा समीती यवतमाळ तर्फे करण्यात आले.

Popular Articles