spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कोदामेंढी येथे पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद

किशोर साहू, मौदा :- कोदामेंढी येथे रविवार (ता. २८ जून) ला राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या अंतर्गत ग्रामपंचायत कोदामेंढी येथे पोलिओ बूथचे उद्घाटन उपसरपंच गोपाल गिरमेकर यांच्या शुभहस्ते बालकांना पोलिओचे दोन थेंब पाजून थाटात पार पडले.

यावेळी आशा स्वयंसेविका माधुरी बावनकुळे, अंगणवाडी सेविका प्रभा ढोमणे, अंगणवाडी मदतनीस सुषमा राखडे ग्रामपंचायत सदस्यगण, आरोग्य कर्मचारी वर्ग, आशा स्वयंसेविका व अंगणवाडी सेविका, मदतनीस मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. गावातील ० ते ५ वर्ष वयोगटातील सर्व बालकांना पोलिओ डोस देण्यात आला.

दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी या घोषवाक्याप्रमाणे गाव पोलिओमुक्त ठेवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला.

Popular Articles