नागपूर :- भारतीय शास्त्रीय नृत्य, संगीत व वाद्यकलेचा समृद्ध वारसा जपण्यासाठी श्रीकृष्ण नृत्यालयम व श्रीकृष्ण कल्चरल फाउंडेशनतर्फे ‘कृष्णमयूकहम-२०२६’ या चार दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. याबाबत बुधवारी झालेल्या पत्रकार परिषदेत आयोजकांनी माहिती दिली. हा महोत्सव २० ते २३ ऑगस्टदरम्यान गुरुनानक भवन येथे होणार आहे. महोत्सवात महाराष्ट्रासह केरळ, मध्य प्रदेश, तेलंगणा, आंध्र प्रदेश, कर्नाटक, गुजरात, पश्चिम बंगाल, दिल्ली, छत्तीसगड आदी राज्यांतील नामांकित कलाकार सहभागी होणार आहेत. २० ऑगस्ट रोजी माधुरी गुर्जर यांचे हिंदुस्तानी गायन, २१ ऑगस्ट रोजी खुशी जैन यांचे भरतनाट्यम व रिमिता पॉल यांचे मणिपुरी नृत्य, तर २२ ऑगस्ट रोजी डॉ. वट्टिकोट्टा यादगिराचार्य यांचे कुचिपुडी आणि यामिनी सुंदरम यांचे भरतनाट्यम सादरीकरण होणार आहे. २३ ऑगस्ट रोजी समारोप सोहळ्यात दिल्लीच्या रूपा राणी दास बोरा यांचे कथक, पुण्याचे अनिरुद्ध देशपांडे यांचे तबला वादन, बंगळुरूचे गुरु राजू एन. यांचे कुचिपुडी तसेच डॉ. हनी उन्नीकृष्णन यांचे मोहिनीअट्टम सादरीकरण होणार आहे. त्यानंतर स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वितरण करण्यात येईल. महोत्सवासाठी समर कुमार सेन, डॉ. प्रमोद लाखे, रवी पी.कुकडे, गजानन रानडे आणि पंकज कुमार यांच्यासह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. आकाशवाणीचे उच्च श्रेणीचे सतारवादक अवनींद्र शोएलिकर यांचीही विशेष उपस्थिती राहणार आहे. श्रीकृष्ण कल्चरल फाउंडेशनच्या संस्थापक व सचिव तसेच श्रीकृष्ण नृत्यालयमच्या प्राचार्या प्रमेस्ला उन्नीकृष्णन यांनी नागपूरकर कलाप्रेमींनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून महोत्सवाचा आनंद घ्यावा, असे पत्र परिषदेत आवाहन केले. महोत्सवाच्या आयोजनासाठी समन्वयक हरी उन्नीकृष्णन, पीयूष बोबडे, मयूर देशमुख, सागर चोपडे, भावेश यांच्यासह स्वयंसेवक परिश्रम घेत आहेत.
श्रीकृष्ण नृत्यालयम व श्रीकृष्ण कल्चरल फाउंडेशनतर्फे ‘कृष्णमयूकहम- २०२६’ चार दिवसीय सांस्कृतिक महोत्सवाचे आयोजन


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.




