– हितेश साबळे यांच्या नेतृत्वात शेकडो शेतकरी धडकले महावितरण कार्यालयावर !
मोर्शी :- रब्बी हंगाम सुरू होण्याच्या सुरुवातीला पहिल्याच दिवशी महावितरण कंपनीने शेतकऱ्यांच्या शेतातील विजेचे वेळापत्रक बदलवल्यामुळे मोर्शी तालुक्यातील शेतकऱ्यांमध्ये रोष व्यक्त होत आहे, रात्रीचा वीज पुरवठा शेतकऱ्यांसाठी त्रासदायक ठरत असून शेतकऱ्यांच्या शेतातील रात्रीला सिंगल फेज लाईन यासह आदी समस्यांचे निराकरण करण्यासाठी हितेश साबळे यांच्या नेतृत्वात पिंपळखुटा जिल्हा परिषद सर्कलमधील शेकडो शेतकऱ्यांनी महावितरण कार्यालयावर धडक देऊन महावितरण कंपनीच्याअधिकाऱ्यांशी संवाद साधून महावितरण कार्यालयात ठिय्या मांडून शेतकऱ्यांचा विजेचा ज्वलंत प्रश्न मार्गी लावण्याची मागणी करण्यात आली त्यावेळी हितेश साबळे, प्रशांत बुरंगे, हितेश उंदरे, ओम ढाकुलकर आकाश साबळे तसेच पिंपळखुटा सर्कलमध्ये शेतकरी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.
पिंपळखुटा मोठा जिल्हा परिषद सर्कल मधील महावितरण केंद्र निंभी व राजवाडी यांचे अंतर्गत येणाच्या सर्व शेतकऱ्यांच्या शेतातील कृषी पंपाची विद्युत वाहिनी चे वेळापत्रक (लोडशेडींग) मध्ये बदल करण्यात यावा. अर्थात रात्री एवजी दिवसा विद्युत पुरवठा करण्यात यावा, तसेच विद्युत वाहिनीमध्ये येणारे बिघाड, ट्रान्सफॉर्मर रिप्लेसमेंट त्वरित करून देण्यात यावे शेतकऱ्यांना रात्री ऐवजी दिवसा सुरळीत वीज पुरवठा करण्यात यावा, असे न झाल्यास सर्व शेतकरी मिळून विभागीय कार्यालय मोर्शी येथे दि. १७/११/२०२५ सोमवार ला महावितरण कार्यालयामध्ये तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सरचिटणीस हितेश साबळे यांनी महावितरण कंपनीचे कार्यकारी अभियंता यांना दिला आहे.








