Home Latest News अक्षय तृतीयेला बालविवाह कराल तर होणार कडक कारवाई

अक्षय तृतीयेला बालविवाह कराल तर होणार कडक कारवाई

0

<p><strong>&&num;8211&semi; जिल्हा बाल संरक्षण कक्ष व्दारे आवाहन<&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>यवतमाळ &colon;-<&sol;strong> येत्या अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर जिल्ह्यात बालविवाह होण्याची शक्यता लक्षात घेता&comma; प्रशासनाकडून कडक पावले उचलली आहेत&period; बालविवाह लावल्यास थेट कारावासाची कारवाई करण्यात येणार आहे&comma; असा स्पष्ट इशारा प्रशासनाकडून देण्यात आला आहे&period; १९ एप्रिल रोजी होणाऱ्या विवाह सोहळ्यांमध्ये बालविवाह होऊ नये&comma; यासाठी विशेष दक्षता घेण्याचे आवाहन जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी मारोती पवार यांनी केले आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>कायद्यानुसार विवाहासाठी मुलाचे किमान वय २१ वर्षे आणि मुलीचे १८ वर्षे पूर्ण असणे आवश्यक आहे&period; यापेक्षा कमी वयात विवाह करणे हे बालविवाह प्रतिबंधक अधिनियम २००६ अंतर्गत बेकायदेशीर आहे&period; या कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी ग्रामीण भागात ग्रामसेवक&comma; तर शहरी भागात बालविकास प्रकल्प अधिकारी यांची बालविवाह प्रतिबंधक अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे&period;<&sol;p>&NewLine;<p>गावपातळीवर सरपंच&comma; पोलीस पाटील आणि अंगणवाडी सेविका यांनी सतर्क राहून विवाहापूर्वी वधू-वरांचे वय तपासण्याचे निर्देश देण्यात आले आहेत&period; बालविवाह हा दखलपात्र गुन्हा असून&comma; यात केवळ पालकच नव्हे तर विवाह सोहळ्यात सहभागी होणारे वऱ्हाडी&comma; भटजी&comma; वाजंत्री&comma; मंगल कार्यालय चालक तसेच बिछायत केंद्र चालक यांच्यावरही गुन्हे दाखल होऊ शकतात&period; दोषींना २ वर्षांपर्यंत सश्रम कारावास आणि १ लाख रुपयांपर्यंत दंडाची शिक्षा होऊ शकते&period;<&sol;p>&NewLine;<p>जिल्हा बालविवाहमुक्त करण्याचा निर्धार केला असून&comma; संशयास्पद विवाहाची माहिती तत्काळ देण्याचे आवाहन करण्यात आले आहे&period; बालविवाहाबाबत माहिती देण्यासाठी चाईल्ड हेल्पलाईन १०९८ किंवा पोलीस विभागाचा ११२ हा टोल फ्री क्रमांक उपलब्ध असून&comma; माहिती देणाऱ्याची ओळख गोपनीय ठेवली जाईल&period;अशी माहिती जिल्हा व बाल संरक्षण अधिकारी देवेंद्र राजूरकर यांनी दिली आहे&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version