सचिन चौरसिया रामटेक ०५ :- तालुक्यातील पेंच व्याघ्र प्रकल्पांतर्गत येणाऱ्या बफर झोनमधील पवनी वनपरीक्षेत्र हद्दीतल पिपरीया परिसरात सालई गावातील द रेस्पो हॉटेलच्या कंपाउंडच्या आतमध्ये एका पट्टेदार वाघाने प्रवेश केला. ही घटना (दि.३) सकाळी ७ ते ८ वाजताच्या दरम्यान घडली. यामुळे तेथील हॉटेलचा कर्मचाऱ्यांसह गावाच्या नागरिकांत दहशतीचे वातावरण निर्माण झाले.
पट्टेदार वाघ गावाशेजारील शेतातून थेट सालई गावालगत असलेल्या हॉटेल परिसरात शिरला. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही आणि गावातील नागरिकांनी आरडाओरड करत वाघाला जंगलाकडे हाकलून लावले. या घटनेची माहिती वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांना देण्यात आली आहे. वनविभागाच्या या दुर्लक्षीत धोरणामुळे या परिसरातील शेतकऱ्यांना शेती करणेसुद्धा कठीण झाले आहे. वारंवार वाघाचे हल्ले होत असल्याने शेतमजूरसुद्धा शेतात जाण्यासाठी तयार नसतात. त्यामुळे शेतीपिकांच्या उत्पादनावर परिणाम पडणार आहे. वनविभागाने निद्रावस्थेतून जागे होऊन वाघाचा बंदोबस्त करणे गरजेचे झाले आहे.
पेंच व्याघ्र प्रकल्पातून पट्टेदार वाघ थेट गावात!


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.



