spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात युवा शक्तीचा दमदार प्रवेश

प्रतिनिधि, भंडारा :- माजी आमदार तथा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षाचे भंडारा जिल्हाध्यक्ष चरण वाघमारे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून विदर्भ युवा क्रांती संघटनेचे संस्थापक हर्षल वाघमारे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार पक्षात प्रवेश केला.

यावेळी शिव-शाहू-फुले-आंबेडकरी विचारांचा पुरोगामी वारसा पुढे नेत राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरदचंद्र पवार यांच्या ध्येयधोरणांना व विचारसरणीला बळ देण्यासाठी काम करण्याचा निर्धार नव्याने पक्षप्रवेश केलेल्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

या पक्षप्रवेश सोहळ्यात दिपक सिंह ठाकुर, रणबिन सिंह बावरी, भाऊन कोंढळे, संतोष वाघमारे, नितेश सोनटक्के, अशोक मेघाम, अरुण मेघाम, विठ्ठल पोहनकर, अभिषेक खलके, अतुल पडोळे, राजेश कोटेकर, प्रमोद सोनकुसरे, हितेश एश्वरकर, आयुष शेंडे, मोहित मेघाम, कुशल नेवारे, अक्षय शेंडे, विन्यास विहारे, राजू कुमले, अमर आडार, दिलीप शेंडे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी पक्षात प्रवेश केला.

या युवा कार्यकर्त्यांच्या प्रवेशामुळे भंडारा जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या संघटनात्मक बांधणीला बळ मिळणार असून, आगामी काळात युवकांना पक्षाच्या विविध उपक्रमांमध्ये सक्रियपणे सहभागी करून घेण्याचा निर्धार यावेळी व्यक्त करण्यात आला.युवा शक्तीच्या या प्रवेशामुळे जिल्ह्यात राष्ट्रवादी विचारांना नवी ताकद मिळाल्याची भावना पक्षाच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.

Popular Articles