Home Latest News आंतरशालेय वादविवाद स्पर्धेचे यशस्वी आयोजन

आंतरशालेय वादविवाद स्पर्धेचे यशस्वी आयोजन

0
65

 

गोंदिया :- मेरिटोरियस पब्लिक स्कूल, तिरोडा येथे आंतरशालेय वादविवाद स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले होते स्पर्धेचा विषय “शासकीय अनुदान योजनांमुळे देशाचा विकास शक्य आहे का?” हा होता.

या स्पर्धेत साकेत पब्लिक स्कूल, गोंदिया, शहीद मिश्रा स्कूल, फादर एग्नल स्कूल, जनता विद्यालय, तुमसर एस.डी.बी. स्कूल, असीम सराफ सेंट्रल अकॅडमी, तिरोडा तसेच आयोजक विद्यालय मेरिटोरियस पब्लिक स्कूल, तिरोडा यांच्या विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला होता.

कार्यक्रमाला मुख्य अतिथी व परीक्षक म्हणून महर्षि चे प्राचार्य डॉ. हरिओम दुबे,सराफ विद्यालय तुमसर चे डॉ. महेश बालपांडे व नगर परिषद तिरोडा संध्या गुनेरिया उपस्थित होते. अध्यक्ष मुकेश अग्रवाल यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना भाषेचे महत्त्व अधोरेखित केले.

परिणाम जाहीर करताना प्रथम क्रमांक वेद रहांगडाले (मेरिटोरियस पब्लिक स्कूल), द्वितीय क्रमांक गुंजन गभने (असीम सराफ सेंट्रल अकॅडमी), तृतीय क्रमांक शुभांशू मिश्रा (एस.डी.बी. स्कूल) यांना मिळाले, तर श्रेया पटले (एस.डी.बी. स्कूल) हिला प्रोत्साहन पारितोषिक देण्यात आले.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिवी सिंह व संस्कृती बिसने यांनी केले, तर आभार प्रदर्शन संजयकुमार परिहार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी शिक्षक रत्नाकर , शैलेश , यांच्यासह सर्व शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.