तिरोडा :- विदर्भ स्तरीय अबॅकस स्पर्धेत विद्यार्थ्यांचा उत्कृष्ट ठसा व गौरवपूर्ण सत्कार OBN Abacus द्वारे मंगळम हॉल, भंडारा येथे 31 ऑगस्ट ला विदर्भ स्तरीय अबॅकस स्पर्धेचे भव्य आयोजन करण्यात आले. या स्पर्धेत विदर्भातील विविध भागांतून सुमारे 200 विद्यार्थी सहभागी झाले.
या स्पर्धेत तिरोडा तालुक्यातील नवेगाव, मुंडिकोटा, बिरसी आणि वडेगाव येथील विद्यार्थ्यांनी माननीय सौरभ निशाने सरांच्या मार्गदर्शनाखाली उल्लेखनीय कामगिरी केली.यामध्ये शौर्य पटले, सान्वी मडपे आणि माही सोयाम यांनी विजेत्यांचा किताब पटकावला.तसेच भव्य जैतवार, रिजुल मेश्राम, आर्या डोंगरे, वीरा पटले, आरोही निशाने, रुद्र पटले, रेशिका भलावी, अनागी नागदेवे, अनन्या ठाकरे, वंश ठाकरे, सक्षम रामटेके, हार्दिक खुम्भरे, सोहिल कटरे, श्रेष्ठ पारधीकर, हर्षिका ठाकरे, क्रती पटले, श्रेया साठवणे, तन्वी राहंगडाले, मौली सोयाम, लावण्या बोरकर, खेमांशु चौधरी या विद्यार्थ्यांनी सुवर्ण पदक जिंकून शाळा व परिसराचा मान उंचावला.
यानंतर दिनांक 11 सप्टेंबर ला ग्रामपंचायत नवेगाव खुर्द येथे या विद्यार्थ्यांचा भव्य सत्कार समारंभ पार पडला.
या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून मान्यवर उपस्थित होते- प्रमिला भलावी, पंचायत समिती सदस्य तिरोडा, उर्मिला पटले, सरपंच, नवेगाव खुर्द,प्रतिमा जैयतवार, सरपंच, मुंडिकोटा, देवेंद्र मंडपे, उपसरपंच, मुंडिकोटा, कोठीराम निशाने, सदस्य, ग्रामपंचायत सदस्य नवेगाव खुर्द,जितेंद्र भलावी, सदस्य, गोपिका पटले, सदस्य, , चंदा मेहराम, सदस्य, ग्रामपंचायत मीनाक्षी पटले, सदस्य, ग्रामपंचायत प्रमिला बिनझाडे, सदस्य, ग्रामपंचायत नवेगाव खुर्द, मान्यवरांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पुरस्कार प्रदान करून गौरवपूर्ण सत्कार करण्यात आला. तसेच त्यांच्या पुढील शैक्षणिक वाटचालीसाठी प्रोत्साहनपर मार्गदर्शन करण्यात आले.




