spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

जवाहर विद्यार्थी गृहात तेली समाजाचा भव्य वधू-वर परिचय मेळावा उत्साहात संपन्न

– ३५० वधू-वरांचा सहभाग; ‘सुयोग’ पुस्तिकेचे मान्यवरांच्या हस्ते प्रकाशन, वैवाहिक जीवन व कायदेशीर बाबींवर मार्गदर्शन

नागपूर :- जवाहर विद्यार्थी गृह, नागपूर यांच्या वतीने सिव्हिल लाइन्स, नागपूर येथे ९ नोव्हेंबर रोजी तेली समाजातील विवाहेच्छुक युवक-युवतींसाठी भव्य वधू-वर परिचय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. या मेळाव्याला तेली समाजातील वधू-वर तसेच समाजबांधवांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. मेळाव्यात सुमारे ३५० वधू-वरांनी सहभाग नोंदवून आपल्या भावी जीवनसाथीच्या निवडीसाठी परिचय करून दिला. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून ॲड. आनंदराव गिरडकर आणि डॉ. आरती वंजारी उपस्थित होते. जवाहर विद्यार्थी गृहाचे अध्यक्ष नरेंद्र दिवटे यांच्या प्रमुख उपस्थितीत मान्यवर पाहुण्यांच्या हस्ते ‘सुयोग’ या वधू-वर परिचय पुस्तिकेचे उद्घाटन करण्यात आले. या पुस्तिकेमुळे विवाहेच्छुक युवक- युवती आणि त्यांच्या पालकांना योग्य स्थळांची माहिती मिळण्यास मदत होणार आहे. यावेळी डॉ. आरती वंजारी यांनी वधू-वरांना वैवाहिक संबंध, परस्पर समजूत दारपणा, विश्वास, संवाद आणि कौटुंबिक जबाबदाऱ्या यांविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. यशस्वी वैवाहिक जीवनासाठी एकमेकांच्या भावना, विचार आणि अपेक्षांचा आदर करणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी प्रमुख पाहुणे ॲड.आनंदराव गिरडकर यांनी वैवाहिक जीवनातील विविध कायदेशीर बाबी, विवाहा संदर्भातील कायदेशीर तरतुदी तसेच पती- पत्नीचे अधिकार व जबाबदाऱ्या याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. विवाहपूर्व आवश्यक माहिती आणि कायदेशीर जाणीव असणे महत्त्वाचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

कार्यक्रमाला विशेष अतिथी म्हणून धर्मराज रेवतकर, गुलाब जुनानकर, मिलिंद माकडे, डॉ. ढोबळे, ॲड. जगदीश गायधने, अरुण वैद्य, शाम वैद्य आणि नानाभाऊ टापरे यांची उपस्थिती होती.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जवाहर विद्यार्थी गृहाचे मुख्य कार्यवाह हर्षवर्धन बेले, कोषाध्यक्ष बालानंद टापरे यांनी विशेष सहकार्य केले. कार्यक्रमाचे संयोजन हरीश जयपूरकर यांनी केले. तसेच कार्यकारिणी सदस्य हरीश दांडेकर, बडवाईक, प्रवीण अंबागडे, लोकनाथ भुरे, रमेश पिसे, प्रकाश तिळगुळे, विजय मोडघरे, रवी उराडे, देवेंद्र वाडीभस्मे आणि प्रफुल्ल रेवतकर यांनी परिश्रम घेतले.

वधू-वर परिचय मेळाव्याच्या माध्यमातून समाजातील विवाहेच्छुक युवक- युवतींना एकाच व्यासपीठावर येण्याची संधी उपलब्ध झाली. समाजातील विवाह इच्छुक कुटुंबांना योग्य स्थळांची माहिती मिळावी, परस्पर परिचय वाढावा आणि विवाह जुळविण्याची प्रक्रिया सुलभ व्हावी, हा या उपक्रमामागील मुख्य उद्देश होता. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांसाठी स्नेहभोजनाची व्यवस्था करण्यात आली. समाज बांधवांच्या मोठ्या सहभागामुळे आणि सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या सहकार्यामुळे हा वधू- वर परिचय मेळावा उत्साहपूर्ण यशस्वीरीत्या संपन्न झाला.

Popular Articles