spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

आजनगांव येथे आज सायं.भाजयूमो तर्फे आयोजित लावणी कार्यक्रमाने दोन दिवसीय मंडईचा थाटात होणार समारोप 

किशोर साहू,मौदा :- आजनगांव (ईसापूर) येथे मंगळवार (ता.१०नोव्हेंबर) पासून दोन दिवसीय मंडई उत्सवाला सुरुवात झालेली आहे. आज बुधवार (ता.११ नोव्हेंबर)ला सायं. भारतीय जनता युवा मोर्चा शाखा आजनगांव तर्फे प्रसिद्ध लावणी सम्राज्ञी कोमल नागपूरकर यांच्या लावणीच्या कार्यक्रमाने दोन दिवसीय मंडई उत्सवाचा थाटात समारोप होणार आहे.

या समारोपीय कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून महसूल मंत्री तथा पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, माजी आमदार डी. मल्लिकार्जुन रेड्डी,माजी आमदार टेकचंद सावरकर, तालुका समन्वय समिती अध्यक्ष तथा भाजपा जिल्हाउपाध्यक्ष नरेश मोटधरे , सरपंच चिंतामण सारवे सह गावातील, परिसरातील, तालुक्यातील, जिल्ह्यातील, सामाजिक व राजकीय क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत. तरी या कार्यक्रमाच्या लाभ घेण्याचे आव्हान शाखा आजनगांव येथील भारतीय जनता युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.

Popular Articles