spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

इलाईट पब्लिक स्कूल चाचेर येथे पाठ्यपुस्तकाचे वितरण 

किशोर साहू, मौदा :- इलाईट पब्लिक स्कूल चाचेर येथे शैक्षणिक वर्ष 2026 -27 चा प्रारंभ रक्षा बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष राष्ट्रपाल गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. याप्रसंगी संस्थेचे कोषाध्यक्ष अमोल रामटेके, उपाध्यक्ष लखन वाघमारे, सदस्य देवेंद्र पानतावणे तसेच सचिव मिथूल पौणीकर उपस्थित होते.

या वेळी राष्ट्रपाल गजभिये यांनी शाळेविषवी विस्तृत माहिती दिली. शाळेमध्ये पालकांना आमंत्रित केले होते.मुलांकडून विविध प्रकारची अँक्टिव्हिटी घेण्यात आली. यावेळी विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके, वह्या देण्यात आले.

संचालन नेहा पाल यांनी केलं तर आभार प्रदर्शन भारती नारनवरे यांनी केलं. आचल वाणी व शबनम छवारेसह इतर शिक्षकवृंद व मदतनीस निकिता चवरे उपस्थित होते.या कार्यक्रमाला दुर्गाप्रेम बहुद्देशीय संस्था खंडाळा सचिव गुप्तपाल गजभिये यांचे विशेष सहकार्य लाभले लाभले.

Popular Articles