नागपूर :- नागपूर येथील शासकीय औद्योगिक विकास संस्थेला (आय.टी.आय) महाराष्ट्र शासनाने तेली समाजाचे आराध्य दैवत श्री संताजी जगनाडे यांचं नाव दिल्यामुळे ८ डिसेंबर चे श्री. संताजी महाराज यांचे जयंतीचे दिवशी महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नामकरण सोहळा संपन्न झाला. याप्रसंगी समाजभूषण राज्याचे महसूलमंत्री व नागपूर जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे, राज्याचे कौशल्य विकासमंत्री मंगलप्रसाद लोढा, प्रांतिक तैलिक महासभेचे राज्य अध्यक्ष खासदार रामदास तडस, पूर्व नागपूरचे आमदार कृष्णा खोपडे, प्रांतिकचे राज्य कोषाध्यक्ष बळवंतराव मोरघडे, महिला आघाडी नागपूर विभागीय अध्यक्षा नयना झाडे, प्रांतिकचे नागपूर शहर अध्यक्ष किशोर भिवगडे, उपाध्यक्ष रमेश माटे, संघटक अभय रेवतकर तसेच जगनाडे स्मारक समितीचे डॉ.यशवंत खोब्रागडे आणि अनेक समाज बंधू भगिनी व शासकीय अधिकारी प्रामुख्याने याप्रसंगी हजर होते. याप्रसंगी राज्याचे मुख्यमंत्री ह्यांचे रामदास तडस यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी मुख्यमंत्री यांनी श्री संताजी जगनाडे महाराज यांचे समाजोपयोगी कार्याचा गुणगौरव करून शासकीय आय.टी.आय. या तांत्रिक संस्थेला त्याचे नाव दिल्यामुळे त्यांची प्रेरणा विद्यार्थी घेतील अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. रामदासजी तडस यांनी याप्रसंगी देवेन्द्र फडणवीस ना. मंगलप्रसाद लोढा यांचे आभार व्यक्त केले.
शिरोमणी संताजी जगनाडे महाराजांना समाजपयोगी कार्याचा गुणगौरव व आयटीआय तांत्रिक संस्थेला नांव दिल्यामुळे राज्याचे मुख्यमंत्री व मंगलप्रसाद लोढा यांचे आभार


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.
Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.



