spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

१७ वी आमसभा व निवडणूक उत्साहात संपन्न;

– राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना नागपूर जिल्हा शाखेची नवी कार्यकारिणी बिनविरोध

नागपूर :- राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटना, महाराष्ट्र राज्य, नागपूर जिल्हा शाखेची १७ वी आमसभा व जिल्हा कार्यकारिणीची निवडणूक जुने सचिवालय परिसरातील स्व. कृष्णराव बिरे सभागृहात उत्साहपूर्ण वातावरणात पार पडली.

आमसभेच्या अध्यक्षस्थानी जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर महल्ले होते. उद्घाटक म्हणून राजेश सोनोने, तर विशेष अतिथी म्हणून दक्षता पथकाचे अधीक्षक अभियंता यशवंत खापरे, राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे अध्यक्ष अशोक दगडे, नारायण समर्थ, बुधाची सुरकर, इंजी. रंजन टिल्लू आणि पुरुषोत्तम मिलमिले उपस्थित होते. मान्यवरांनी कर्मचारी संघटनांची भूमिका, कर्मचारी हक्क आणि संघटनात्मक एकजुटीचे महत्त्व यावर मार्गदर्शन केले. यावेळी बोलताना अशोक दगडे यांनी जुनी पेन्शन योजना लागू करणे, सार्वजनिक व कल्याणकारी योजनांचे खासगीकरण थांबविणे तसेच श्रम कायद्यांतील कामगारविरोधी बदलांना संघटितपणे विरोध करण्यासाठी कर्मचारी वर्गाने आंदोलनासाठी सज्ज राहावे, असे आवाहन केले. आमसभेत सरचिटणीसांचा अहवाल, विविध मागण्यांवरील ठराव, घटना व नियमांतील दुरुस्त्या यावर सविस्तर चर्चा करून मंजुरी देण्यात आली. तसेच संघटनेचा जमा-खर्च व ताळेबंदही मंजूर करण्यात आला.

कार्यक्रमाला जिल्हा संघटनेचे पदाधिकारी, विविध विभागांचे कर्मचारी प्रतिनिधी आणि नागपूर जिल्ह्यातील राज्य सरकारी कार्यालयांतील जनरल कौन्सिल सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते. यानंतर १७ व्या जिल्हा अधिवेशनात जिल्हा कार्यकारिणीची निवडणूक निवडणूक निर्णय अधिकारी इंजी. रंजन टिल्लू व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी पुरुषोत्तम मिलमिले यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सर्व पदाधिकारी व कार्यकारिणी सदस्य बिनविरोध निवडून आले. नवीन कार्यकारिणीत ज्ञानेश्वर महल्ले (अध्यक्ष), मेघा करारे (कार्याध्यक्ष), अशोक दगडे (सरचिटणीस), देवेंद्र शिंदोडकर, नशिकेत भांडारकर, अभय चिखले व किरण सुपे (उपाध्यक्ष), राजेंद्र ढोमणे, मिलिंद धोंगडे, मनोज भगत व राजेश राऊत (सहसचिव), सहदेव चव्हाण (कोषाध्यक्ष) साहेबराव गुडदे सचिव कल्याण, यांच्यासह विविध कार्यकारिणी सदस्यांची बिनविरोध निवड झाल्याची घोषणा निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी केली.

आमसभा व निवडणूक यशस्वी करण्यासाठी जिल्हा संघटनेच्या पदाधिकारी, प्रतिनिधी आणि कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

Popular Articles