spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

इलाईट पब्लिक स्कूल चाचेर येथे शैक्षणिक वर्ष 2025 – 26 चा प्रारंभ एक जुलैपासून.

कोदामेंढी ०५ : यंदाच सुरू झालेल्या चाचेर येथील इलाईट पब्लिक स्कूल चा शैक्षणिक वर्ष 2025 – 26 चा प्रारंभ रक्षा बहुउद्देशीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष  राष्ट्रपाल गजभिये यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला. या विशेष दिवशी  कोषाध्यक्ष अमोल रामटेके, उपाध्यक्ष लखन वाघमारे , सदस्य देवेंद्र पानतावणे,गौतम पानतावणे  सचिव मिथूल पौणीकर  उपस्थित होते.
यावेळी राष्ट्रपाल गजभिये यांनी  शाळेविषयी विस्तृत माहिती दिली. शाळेमध्ये पालकांना आमंत्रित केले होते.मुलांकडून विविध प्रकारची अँक्टिव्हिटी करण्यात आली. बुक, नोटबुक ,पेन्सिल, रबर विद्यार्थ्यांना देण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन नेहा पाल यांनी केलं तर आभार प्रदर्शन शबनम शेख यांनी केलं. शिक्षक वृंद जयश्री भिवगडे , भारती नारनवरे उपस्थित होत्या.मदतनीस मनून निकिता चवरे यांनी मदत केली.या कार्यक्रमाला  दुर्गाप्रेम बहुद्देशीय संस्था खंडाळा सचिव गुप्तालाल गजभिये यांचे विशेष सहकार्य लाभले.

Popular Articles