spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

विजय ग्रंथाचे सामूहिक पारायण जैन कलार समाज भवनात भक्तिमय वातावरणात संपन्न

नागपूर :- अधिक मासानिमित्त कमला एकादशीच्या पावन पर्वावर रेशीमबाग येथील जैन कलार समाज भवनात भक्ती आणि श्रद्धेचा अनोखा संगम अनुभवायला मिळाला. जैन कलार समाज ज्येष्ठ नागरिक मंडळ आणि आपुलकी परिवार यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रमात ‘श्री गजानन विजय’ ग्रंथाचे भव्य सामूहिक पारायण मोठ्या उत्साहात पार पडले. कार्यक्रमाची सुरुवात सायंकाळी श्री गजानन विजय ग्रंथाच्या २१ व्या, अध्यायाच्या सामूहिक वाचनाने झाली. यामध्ये मोठ्या संख्येने उपस्थित गजानन भक्तांनी श्रद्धाभावाने सहभाग नोंदविला. त्यानंतर संत ज्ञानेश्वर माऊली विरचित हरिपाठाचे सामूहिक पठण करण्यात आले.

हरिनामाच्या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला. या कार्यक्रमाचे विशेष आकर्षण म्हणजे पुरुष भक्तांनी पारंपरिक पांढरे वस्त्र आणि टोपी परिधान केली होती, तर महिला भक्तांनी पिवळ्या रंगाच्या साड्या नेसून सामूहिक पारायणात सहभाग घेतला. एकसारखे वेशभूषेमुळे कार्यक्रमाला धार्मिक आणि सांस्कृतिक वैभव प्राप्त झाले. कमला एकादशीला गजानन नामांतर रंगले भाविक जणू काही शेगावच अवतरले असं वाटत होते. याप्रसंगी भक्तगण मंत्रमुग्ध झाले.

कार्यक्रमाची सांगता शेगाव परंपरेनुसार श्री संत गजानन महाराजांच्या महाआरतीने करण्यात आली. लगेच आरतीनंतर उपस्थित भक्तांनी दर्शन घेऊन प्रसादाचा लाभ घेतला. याप्रसंगी अध्यक्ष अनिल तिडके जैन कलार समाज ज्येष्ठ नागरिक मंडळ आणि आपुलकी परिवाराचे अध्यक्ष राजेश पालंदुरकर, प्रमोद पालंदुरकर ठवरे,  भदाडे, अक्षय तिडके यांच्या मार्गदर्शनात अप्रतिम कार्यक्रम पार पडला. आयोजकांनी सन्मान चिन्ह देऊन मोठ्या प्रमाणावर उपस्थित झालेल्या भाविक भक्तांसमोर श्री संत गजानन महाराज हरिपाठ मंडळाचे अध्यक्ष चंद्रशेखर क्षेत्रपाल दादांना गौरविण्यात आले. यावेळी संपूर्ण कार्यक्रम भक्तिभाव, नामस्मरण आणि आध्यात्मिक उत्साहाने संपन्न झाला.

Popular Articles