हंसराज,भंडारा :- जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाच्या दुपारी 12 वाजेपर्यंतच्या दैनिक अहवालानुसार, आज भंडारा जिल्ह्यातील प्रमुख सिंचन प्रकल्पांमध्ये समाधानकारक जलसाठा असून वेणगंगा नदी सध्या इशारा पातळीखाली वाहत आहे. कारधा लहान पुलावरील वेणगंगा नदीची पाणीपातळी 243.91 मीटर असून इशारा पातळी 245.00 मीटर आहे.जिल्ह्यातील पाच प्रमुख प्रकल्पांपैकी पुजारीटोला प्रकल्पात सर्वाधिक 84.69 टक्के जलसाठा असून 4 गेट 0.30 मीटरने उघडण्यात आले आहेत. गोसेखुर्द प्रकल्पात 59.89 टक्के जलसाठा असून 13 गेट 0.50 मीटरने उघडे आहेत, तर धापेवाडा प्रकल्पात 43.91 टक्के जलसाठा असून 9 गेट 2 मीटरने उघडण्यात आले आहेत.
गेल्या 24 तासांत जिल्ह्यात सरासरी 20.7 मिमी पावसाची नोंद झाली. यामध्ये साकोली तालुक्यात सर्वाधिक 37.2 मिमी, तुमसरमध्ये 29.1 मिमी, लाखनीमध्ये 20.6 मिमी, भंडाऱ्यात 18.8 मिमी, मोहाडीत 18.7 मिमी, लाखांदूरमध्ये 15.7 मिमी आणि पवनीमध्ये 13.7 मिमी पाऊस झाला. 1 जून 2026 पासून आजपर्यंत जिल्ह्यात सरासरी 83 टक्के पावसाची नोंद झाली आहे.





