Home Latest News खुन करणाऱ्या अज्ञात आरोपींचा अवघ्या ४ तासांत उलगडा

खुन करणाऱ्या अज्ञात आरोपींचा अवघ्या ४ तासांत उलगडा

0

<h3><&sol;h3>&NewLine;<p><strong>स्थानिक गुन्हे शाखा नागपूर ग्रामीणची धडाकेबाज कामगिरी – पोलीस स्टेशन कुही हद्दीतील घटना <&sol;strong><&sol;p>&NewLine;<p><strong>कुही ९ –<&sol;strong> दिनांक ७ सप्टेंबर २०२५ रोजी मौजा कुसुंबी येथे देवराव शामराव भरजाळे &lpar;वय ५६&comma; रा&period; शिवांगी नगर&comma; नागपूर&rpar; यांचा धारदार शस्त्राने खून झाल्याची घटना घडली&period; भरजाळे हे आपल्या दुचाकीने &lpar;क्र&period; MH 49 W 4889&rpar; एकटेच निघाले असता उमरगाव–पांढरकवडा रोडवरील टर्निंग जवळ अज्ञात व्यक्तींनी त्यांच्या गळ्यावर व शरीरावर वार करून ठार मारले&period; या प्रकरणी पोलीस स्टेशन कुही येथे खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता&period;<&sol;p>&NewLine;<p>घटनेची गंभीर दखल घेत वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली कुही पोलीस व स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तात्काळ तपास सुरू केला&period; कौशल्यपूर्ण तपास&comma; गुप्त माहिती व तांत्रिक पुरावे यांच्या आधारे अवघ्या ४ तासांतच गुन्ह्यातील आरोपींचा उलगडा करण्यात आला&period;<&sol;p>&NewLine;<p>तपासात उघड झाले की&comma; मृतकाचा नातेवाईक अंकित संजय येळणे &lpar;वय २६&comma; रा&period; पिपळा&comma; हुडकेश्वर&rpar; याचा प्रॉपर्टीच्या वादातून मृतकाशी वाद सुरू होता&period; त्याने आपल्या मित्र मुक्तेश्वर ज्ञानेश्वर मेश्राम &lpar;वय ३८&comma; रा&period; दुबेनगर&comma; पिपळा&comma; हुडकेश्वर&rpar; याला खुनाची सुपारी दिली&period; दिनांक ७ सप्टेंबर रोजी मृतक कुसुंबी येथे जाणार असल्याची माहिती अंकितला होती&period; त्यानुसार त्याने मुक्तेश्वर आणि गणेश गंगाराम हुड &lpar;वय ३८&comma; रा&period; दुधाळा&comma; तह&period; मौदा&rpar; यांना घटनास्थळी पोहोचवले&period; यावेळी गजानन नामदेवराव कडू &lpar;वय ३८&comma; रा&period; पिपळा&comma; हुडकेश्वर&rpar; याने मृतक घराबाहेर पडल्याची माहिती आरोपींना दिली&period; त्यानंतर सकाळी ९ ते १० वाजता मुक्तेश्वर आणि गणेश यांनी धारदार शस्त्राने वार करून खून केला&period;<&sol;p>&NewLine;<p>सदर चारही आरोपींना – अंकित येळणे&comma; मुक्तेश्वर मेश्राम&comma; गजानन कडू व गणेश हुड – स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ताब्यात घेतले असून त्यांना कुही पोलीसांच्या ताब्यात देण्यात आले आहे&period; आरोपींवर खुनाचा गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असून पुढील तपास कुही पोलीस करीत आहेत&period;<&sol;p>&NewLine;

Exit mobile version