नागपूर :- बेलतरोडीतील गार्डन कोर्ट सोसायटीच्या नवनिर्मित पंचायतन शिव मंदिरात देवदेवतांची विधिवत प्रतिष्ठापना करण्याचा 3 दिवसांचा सोहळा उत्साहात पार पडला. यात शिवलिंगासह नंदी आणि नाग, श्रीगणेश, दुर्गामाता, विठ्ठलरुख्मिणी, हनुमान यांचा समावेश आहे.
शनिवारी रात्री सर्व मूर्ती विधिपूर्वक धान्याच्या राशीत ठेवण्यात आल्या. रविवारी सकाळी महिलांच्या कलशयात्रेने प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला प्रारंभ झाला. सर्व मूर्तींना अभिषेक, जोडप्यांद्वारे पूजन, आरती करून त्यांना मंदिरातील नियोजित जागी स्थानापन्न करण्यात आले. हवन आणि महाआरतीनंतर प्राणप्रतिष्ठेची प्रक्रिया पूर्ण झाली.
सोमवारी पहाटे भस्मारती झाल्यावर हा सोहळा संपन्न झाला. या संपूर्ण सोहळ्यात बालगोपालांसह सर्वच वयोगटातील रहिवाशी मोठ्या संख्येत सहभागी झाले होते. सोसायटीचे पदाधिकारी (कोअर टीम) आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी हा सोहळा यशस्वी करण्यासाठी परिश्रम घेतले. तीनही दिवस पंडित प्रकाश ठाकरे यांनी या सोहळ्याचे पौरोहित्य केले.