spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

खुनाचा गुन्हयाची केली उकल, आरोपीला अवघ्या ४ तासात केले निष्पन्न, कळमेश्वर पोलीसांची कामगिरी

कळमेश्वर :- सदर गुन्हा कळमेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत मौजा मोहगाव सावंगी शिवार, जि. नागपुर येथे दिनांक १३/१२/२५ चे रोजी घडला असून यातील मृतक नामे अरूण रामाजी तुरारे वय ४३ वर्षे, वार्ड के १५, धनगरपुरा, मोहपा कळमेश्वर जि नागपुर हा मोहगाव सावंगी शिवार येथील त्यांचे शेतात काम करीत होता. सदर मृतकाची पत्नी ही दुसऱ्या शेतात काम करत होती. मृतकाची पत्नी ही घरी जाण्यासाठी बोलविण्याकारीता गेली असता पती मिळुन न आल्याने तिने नातेवाईकांसह त्याचा शोध घेतला परंतु पती मिळुन न आल्याने तिने पोलीस चौकी मोहपा येथे माहीती दिली. पोलीस आणि वनविभाग यांनी मोहगाव सावंगी शिवार येथे नाल्यामध्ये मानवी अवयव जळत असल्याचे दिसले. सदर प्रेत मृतक अरूण रामाजी तुरारे याचेच असल्याबाबत समजले. मृतकाची पत्नी जोस्ना अरूण तुरारे यांनी सदर प्रकरणी तोडी रिपोर्ट दिल्यावरून पोलीस स्टेशन कळमेश्वर येथे कलम १०३ (१) भारतीय न्याय संहीता अन्वये गुन्हा नोंद आहे. फिर्यादी यांनी त्यांचे भासरे चंद्रशेखर तुरारे यांनीच सदर खून केल्याचा संशय व्यक्त केला होता. सदर गुन्हयातील संशयीत आरोपी नामे चंद्रशेखर रामाजी तुरार, वय ५८ वर्ष, रा मोहपा, ता. कळमेश्वर, जि. नागपुर याचेकडे पोलीसांनी कौशल्यपुर्वक विचारपुस केली. असता त्याने शेती चे आणि घराचे हिस्याचे कारणावरून मृतकाचा खुन केल्याबाबत कबुली दिली. अवघ्या ४ तसात कळमेश्वर पोलीसांनी सदर गुन्हयाची उकल करत आरोपीला ताब्यात घेतले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.