spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

हलाबांच्या न्याय हक्कासाठी 5 डिसेंबर पासुन होणाऱ्या आमरण उपोषणाला संस्थेतर्फे संपूर्ण पाठिंब्याची घोषणा

नागपूर :- ब्रिटीश कलावधीतील सन १९११ च्या एथनोयॉफिक अहवाला प्रमाणे हलबा ही जमात मध्य भू-भागामधील रहिवासी आहे. हलबा/हलबी ही जमात मूळात निसर्ग पूजक असून त्यांची मातृभाषा हलबी आहे. हलबा /हलबी ही जमात मध्य प्रांत व वन्हाड च्या भूभागांमध्ये स्थलांतरीत होऊन शेती, शेतमजूरी सोबतच उपजीविकेसाठी विणकरी व्यवसायाचा स्वीकार केला. विणकरी करणाऱ्या समूहाला “कोष्टी” या नावाणे मराठी भाषेमध्ये ओळखल्या जात होते. ही बाब महाराष्ट्र शासनाने सन १९६५ च्या अधिसूचना क्र. ५ मध्ये विणकरी या व्यवसायक शब्दाला “कोष्टी” या समानार्थी नावाने अधिसूचित केलेले आहे. विदर्भातील हलबा / हलबी जमातीच्या लोकांनी विणकरी व्यवसाय स्वीकारल्यामुळे “कोष्टी” या व्यवसाईक नोंदीमुळे भारतीय घटनेनुसार प्राप्त अधिकारांपासून वंचित ठेवण्याचा प्रयत्न होत आहे.

सी.पी.एण्ड बेरार (मध्य प्रांत व वऱ्हाड) मधील हलबांचा प्राचीन इतिहास सन १८२७ ते सन १९५० पूर्वीचा सरकारी पुराव्यावरून कोष्टी व्यवसायात हलबा जमात होती, हे मान्य करून मा. मुंबई उच्च न्यायालयाने आणी सर्वोच्च न्यायालयाने सुध्दा अनेक प्रकरणात अनुसूचीत जमातीचे हलबा हलबी मान्य करून निर्णय दिलेले आहेत.

महाराष्ट्रातील हलबा /हलबी जमातीचे घटना यादीत समावेश असताना कोष्टी या व्यवसायवाचक शब्दांमुळे हलबा / हलबी या जमातीच्या घटनात्मक सवलतीमध्ये बाधा निर्माण करून शासकीय लाभांपासून वांचीत ठेवण्यात येत आहे. मागील ४०-४५ वर्षापासून हलबा समाज संघर्ष करीत आहे. अनेक आंदोलने झाली पान शासन दरबारी न्याय मिळत नाही. त्यामुळे हलबा समाजात असंतोषाचे वातावरण निर्माण झालेले आहे, आणी म्हणून समाजाने हलबांच्या न्याय हक्काचे प्रश्न सुटत नाही जो पर्यन्त शासनाच्या विरोधात संघर्षात्मक आमरण उपोषणा ला डॉ. सुशील कोहाड व श्री जगदीश खापेकर हे 5 डिसेंबर रोजी रा. बा. कुंभारे यांच्या पुतळ्याजवळ गांधीबाग, नागपूर येथे बसणार असून हलबा समाजाने विरोधात उपोषण शक्ती प्रदर्शन करावे. असे कळकळीचे आवाहन आदिवासी हलबा समाज विकास संस्थेत करण्यात येत आहे. असे प्रसिद्धी पत्रकाद्वारे भास्कर चिचंघरे यांनी सांगितले.

Popular Articles