spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

चंद्रपूर जिल्ह्यातील 9 नगरपरिषद आणि 1 नगरपंचायतीत आज मतदानाला सुरुवात; 65 नगराध्यक्ष आणि 1,079 नगरसेवक पदांसाठी अटीतटीची लढत

चंद्रपूर :- चंद्रपूर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आज सकाळपासून मतदानास सुरुवात झाली असून, मतदारांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. जिल्ह्यातील नऊ नगरपरिषद आणि एका नगरपंचायतीसाठी हा महत्त्वपूर्ण मतदानाचा दिवस ठरला आहे.

65 नगराध्यक्ष पदांसाठी जोरदार स्पर्धा

या निवडणुकांमध्ये एकूण 65 नगराध्यक्ष पदांसाठी उमेदवार रिंगणात आहेत. यांपैकी अनेक ठिकाणी थेट बहुकोनी लढती होत आहेत, तर काही नगरपरिषदांमध्ये सत्ताधारी आणि प्रमुख विरोधी पक्षांमध्ये थेट संघर्षाचे चित्र दिसत आहे.

 1,079 नगरसेवक पदांसाठी उमेदवारांचे भवितव्य EVM मध्ये बंद

जिल्ह्यातील नऊ नगरपरिषद व एका नगरपंचायत क्षेत्रात नगरसेवक पदासाठी 1,079 उमेदवार रिंगणात आहे प्रचार मोहिमेदरम्यान सर्व उमेदवारांनी आपापल्या क्षेत्रातील कामांचा, विकासाच्या योजना आणि भावी आश्वासनांचा लेखाजोखा मतदारांसमोर मांडला.

काँग्रेस–भाजपमध्ये बंडखोरीचा फटका

यावेळी जिल्ह्यात काँग्रेस आणि भाजप या दोन्ही राष्ट्रीय पक्षांना बंडखोरी चा सामना करावा लागला काही ठिकाणी अधिकृत उमेदवारांवर नाराज असलेल्या बंडखोरांनी स्वतंत्र उमेदवारी केली असून त्यामुळे सरळसरळ लढती आणखी चुरशीच्या बनल्या आहेत.

प्रचारात आरोप–प्रत्यारोपांचा वर्षाव; सेलिब्रिटींचीही एन्ट्री

प्रचारादरम्यान अनेक ठिकाणी आरोप–प्रत्यारोप, परस्पर टीका आणि सोशल मीडियावर चांगलीच खळबळ पाहायला मिळाली. काही नगरपरिषदांचा प्रचारासाठी सेलिब्रिटींच्या उपस्थितीमुळे प्रचाराला वेगळीच रंगत आली आणि जनतेचे लक्ष वेधले गेले.

कडेकोट पोलीस बंदोबस्त

मतदान शांततेत आणि सुव्यवस्थित पार पडावा यासाठी पोलीस दल, SRPF आणि स्थानिक सुरक्षा यंत्रणा मोठ्या संख्येने तैनात करण्यात आल्या आहेत. संभाव्य संवेदनशील बूथवर विशेष गस्त आणि निगराणी ठेवण्यात आली आहे.

आज ठरणार उमेदवारांचे भविष्य

सकाळपासून नागरिक मतदानासाठी बाहेर पडत असून, त्यांचे मतदान उमेदवारांचे भविष्य EVM मशीनमध्ये बंद करणार आहे. दुपारनंतर मतदानाचा वेग आणखी वाढण्याची शक्यता आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.