spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावरील समाधानच शिबिराचे खरे यश – माजी जी प सदस्य अनिल निधान

कामठी :- कामठी तालुक्यातील वडोदा येथे आयोजित छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर हे केवळ प्रशासकीय उपक्रम नसून सर्वसामान्यांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरणारे लोकाभिमुख पाऊल आहे असे प्रतिपादन माजी जी प सदस्य अनिल निधान यांनी व्यक्त केले.

यावेळी ते म्हणाले की शासनाच्या योजना कागदोपत्री न राहता त्या थेट त्या थेट तळागाळातील नागरिका पर्यंत पोहोचल्या पाहिजेत .

समाजातीलसर्वसामान्य,शेतकरी,विद्यार्थी आणि गरजू कुटुंबाच्या अडचणी प्रत्यक्ष जाणून त्यावर तात्काळ उपाय करण्यासाठी राज्याचे महसुल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या मार्गदर्शनार्थ कामठी तालुक्यात अशा समाधान शिबिराचे आयोजन करण्यात येत आहे. या समाधान शिबीरात मोठ्या संख्येने नागरिकांनी शिबिरास भेट दिली व 2242 लाभार्थ्यांना अनेक सेवा व लाभ कागदोपत्रासह थेट शिबिरास्थळी विणामुल्य उपलब्ध करून देण्यात आल्यामुळे नागरिकांच्या चेहऱ्यावर समाधानाचे भाव स्पष्टपणे दिसून आले तेव्हा लाभार्थ्यांच्या चेहऱ्यावर उमटणारे समाधान त्यांच्या डोळ्यातील कृतज्ञतेची चमक आणि त्यांच्या आयुष्यात निर्माण होणारा दिलासा हाच अशा समाधान शिबिराचा खरा उद्देश आणि खरे यश आहे अशा शब्दात आपले मौलिक मत माजी जी प सदस्य आणिल निधान यांनी व्यक्त केले.

छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर वडोदा तहसील कामठी येथे अतिरिक्त आयुक्त श्री राजेश खवले यांचे प्रमुख उपस्थितीत व उपविभागीय अधिकारी . संजय पवार साहेब यांचे मार्गदर्शना खाली पार पडले. शिबिरस्थळी तहसीलदार कामठी गणेश जगदाळे, तालुका कृषी अधिकारी प्रणित गंगावणे, नायब तहसीलदार सारिका धात्रक, नायब तहसीलदार मयूर चौधरी, उपअधिक्षक भूमी अभिलेख मेहरकुळे, दुय्यम निबंधक दीप्ती पराते आणि अन्य विभागाचे विभाग प्रमुख, कर्मचारी तसेच वड़ोदा ग्रा प सरपंच राजू भाऊ थोटे, उप सरपंच दत्तूजी हलमारे,कामठी पंचायत समिती चे माजी सभापती रामकृष्ण वंजारी,उमेश रडके, रमेश चिकटे,अध्यक्ष तंटामुक्त समिती सुधाकर ठवकर,भाजप कामठी तालुका अध्यक्ष सचिन घोडमारे, जिल्हा परिषद सदस्या अवंतिका लेकुरवाळे, , इतर लोक प्रतिनिधि यांची उपस्थीती होती..शिबिराचा शुभारंभ अतिरिक्त आयुक्त राजेश खवले यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला माल्यार्पण व दिपप्रज्वलन करून करण्यात आली.शिबिराचे संचालन तहसिलदार गणेश जगदाळे यांनी केले तर आभार नायब तहसीलदार मयूर चौधरी यांनी केले .शिबिरात वडोदा मंडळातील ग्रामस्थ मोठ्या संख्येत उपस्थित होते. शिबिरात समस्त विभागाचे स्टाल लावण्यात आले होते.शिबिराच्या यशस्वीतेसाठी मंडळातील समस्त विभागाचे अधिकारी सह मंडळ अधिकारी व तलाठी यांनी मोलाची भूमिका साकारली.

Popular Articles