spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

साहित्यिक आणि बुद्धिजीवीन्मुळे रिपब्लिकन चळवळीला खीळ बसली – डॉ. ढोके

– रिपब्लिकन चळवळीला साहित्यिक आणि बुद्धिजीवीन्मुळे खीळ बसल्याची खंत ज्येष्ठ रिपब्लिकन विचारवंत डॉ. एन व्ही ढोके यांनी व्यक्त केली.

दि रिपब्लिकन्स या संघटनेमार्फत जिल्हा परिषदेच्या शाळेत आयोजित केलेल्या समता सैनिक दलाच्या प्रशिक्षणात ते मार्गदर्शक म्हणून बोलत होते. दि रिपब्लिकनचे संस्थापक आणि रिपब्लिकन युवा नेतृत्त्व हर्षवर्धन ढोके यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते

डॉ.एन व्ही ढोके म्हणाले, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा रिपब्लिकन विचार पुढे नेवून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाची बांधणी करण्याऐवजी साहित्यिक कविता, कादंबऱ्या लिहित बसले. कवी संमेलने घेण्यात त्यांना धन्यता वाटते. मात्र सर्वसामान्यांचे प्रश्न कथा, कादंबऱ्या, कविता लिहून सुटत नसतात. त्यासाठी भक्कम राजकारण करावे लागते. साहित्यिकांनी लोकांच्या प्रश्नांकडे पाठ फिरवली. हर्षवर्धन ढोके यांनी विद्यमान समता सैनिक दलाच्या योग्यतेवर प्रश्न चिन्ह उभे केले. खंड 17 मध्ये बाबासाहेबांच्या समता सैनिक दलाच्या घटनेत RPI चा अध्यक्ष SSD च्या प्रमुखाची नियुक्ती करतो. समता सैनिक दलाची निर्मिती RPI च्या उभारणीसाठी आहे. लेफ्ट राईट करण्यासाठी नव्हे अशी स्पष्ट भूमिका त्यांनी मांडली. समता सैनिक दलाचे राहुल सोमकुवर आणि विशाल शेंडे यांनी हे प्रशिक्षण आयोजित करण्यास पुढाकार घेतला. यावेळी मडासावंगी, परसोडी, पिपळा, बागोडा आणि कनियाडोल येथील दलाचे सैनिक प्रशिक्षणात सहभागी झाले होते.

Popular Articles