spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

कामठी तालुक्यातील नऊ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा बिगुल

कामठी :-11 फेब्रुवारी 2026 मध्ये मुदत संपलेल्या कामठी तालुक्यातील घोरपड, लोणखैरी, भामेवाडा, महालगाव, पावनगाव, कोराडी, खेडी, टेमसना, केसोरी अश्या नऊ ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा बिगुल नोव्हेंबर अखेर वाजण्याची शक्यता निर्माण झाली आहे.सदर ग्रामपंचायतीची अंतिम प्रभागरचना 4 मे रोजी जाहीर झाली असून सरपंच आरक्षण प्रक्रियाही पूर्ण झाली आहे. आता ग्रामपंचायत सदस्यांच्या आरक्षण सोडतीकडे गावागावातील इच्छुकांचे लक्ष लागले आहे.राज्य शासनाच्या ग्रामविकास विभागाने 17 फेब्रुवारी रोजी ग्रामपंचायतीच्या प्रभागरचनेचा कार्यक्रम जाहीर केला होता.त्यानुसार 30 मार्चपर्यंत प्रारूप प्रभागरचना तयार करण्यात आली.13 एप्रिल पर्यंत हरकती व सूचना मागविण्यात आल्या होत्या त्यानंतर सुनावण्या पूर्ण करून 4 मे रोजी अंतीम प्रभागरचना प्रसिद्ध करण्यात आली.आता निवडणुकीपूर्वी मतदार याद्या अंतिम करण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे.राज्य निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत सदस्यांच्या आरक्षण सोडतीचाही कार्यक्रम जाहीर केला आहे 12 जून रोजी ग्रामसभामध्ये प्रभागनिहाय आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे.गावपातळीवरील पॅनल राजकारणासाठी ही सोडत निर्णायक मानली जात असून कोणत्या प्रभागात कोणते आरक्षण पडणार याकडे संभाव्य उमेदवारांचे लक्ष लागले आहे. बॉक्स-8 जून रोजी सोडतीसाठी ग्रामसभेची अधिसूचना,12 जून रोजी ग्रामसभा व आरक्षण सोडत,19 जून रोजी प्रारूप आरक्षण प्रसिद्धी,19 ते 25 जून दरम्यान हरकती व सूचना, 3 जुलै रोजी प्रांताधिकाऱ्यांचा अभिप्राय ,10 जुलै रोजी अंतीम आरक्षण प्रसिद्धी करण्यात येणार आहे.

Popular Articles