spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

पेट्रोल-डिझेल दरवाढ व खतांच्या वाढत्या किमतीच्या निषेधार्थ कांग्रेस सेवादलचे आंदोलन

कामठी :- केंद्र व राज्य सरकारने मे महिन्यात पेट्रोल व डिझेलच्या दरामध्ये सलग चार वेळा दरवाढ करून सर्वसामान्य नागरिक, शेतकरी व कष्टकरी जनतेला आर्थिक संकटात ढकलल्याचा आरोप करीत कामठी शहर कांग्रेस सेवादल च्या वतीने कांग्रेस सेवादल कामठी शहर अध्यक्ष डॉ सुनील वाघमारे यांच्या नेतृत्वात आज कामठी तहसील कार्यालयावर शासन विराधात तीव्र निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी तहसिलदार यांना निवेदन देऊन इंधन दरवाढ मागे घेण्याची तसेच रासायनिक खतांच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण आणण्याची मागणी करण्यात आली. निवेदनात म्हटले आहे की पेट्रोल डिझेलच्या वाढत्या किमतीमुळे वाहतूक खर्च वाढून महागाईला चालना मिळत आहे त्याचबरोबर रासायनिक खतांच्या वाढलेल्या दरामुळे शेतीचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणात वाढला असून शेतकरी हवालदिल झाला आहे त्यामुळे केंद्र व राज्य सरकारच्या धोरणा विरोधात कांग्रेस सेवादल च्या वतीने तीव्र नाराजी व्यक्त करण्यात आली. निवेदन सादर करतेवेळी कांग्रेस सेवादल कामठी शहर अध्यक्ष डॉ सुनील वाघमारे, राजकुमार गेडाम,विपीन गायकवाड, पंकज खोब्रागडे, अजाबराव उईके,प्रकाश लाइनपांडे, तेजराम रघमंडले, मनीष गजभिये,सुधा राऊत, परवेज शाहीन,प्रणाली बन्सोड, अर्चना ढोके, आरिफ सरमातीया, अलंकार गजभिये आदी प्रामुख्याने उपस्थित होते.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.