कामठी :- कामठी तालुक्यातील आजनी येथे नवरात्री निमित्त सध्या भजन , जस आणि सांस्कृतिक कार्यक्रमांची रेलचेल सुरू असली तरी, सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाच्या वतीने कुठल्याही अनुभवी व्यक्तीच्या मार्गदर्शना शिवाय गावातीलच मुलांनी साकारलेले बारा ज्योतिर्लिंग आणि वाघाच्या तोंडातली गुहा हे पंचक्रोशीत आकर्षणाचे केंद्र बनली आहे. तसेच देखाव्यापुढे वृक्ष ठेवून पर्यावरणाचा संदेश सुद्धा दिला गेला आहे.
अगदी टाकाऊ वस्तूंपासून बनविलेल्या या गुफेत माती आणि पीओपी पासून बनविलेल्या बारा ज्योतिर्लिंगाची स्थापना केली गेली आहे. विविध रोषणाई आणि या देखाव्याचे सर्वत्र कौतुक केल्या जात आहे. या देखाव्यासाठी गावातील गजेंद्र ढोक, ऋषिकेश भोयर, सुमित भोयर, अमित भोयर, भूषण मुलकर, अर्पित खेवले, अभिजित वाणी, ललित सलामे, आदित्य चिंचुलकार, गौरव खेवले, श्रीकांत सलामे,शुभम मुलकर अमोल सोनटक्के, बंडू हरणे, नीरज हरणे, मयूर हरणे, सार्थक हरणे,ऋषभ धंदरे, आदी पाली, दादू खेवले, तन्मय वाणी, आदित्य देशमुख आणि सर्व जय बजरंग व्यायाम शाळा तसेच सार्वजनिक दुर्गा उत्सव मंडळाच्या कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले आहे. यावेळी गावातील कला शिक्षक विजय वांढरे यांनी फार मोठे सहकार्य केले.




