spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

भरदिवसा वृद्ध महिलेला बंदक करून चोरट्यांनी घरातील ५१ हजाराचा मुद्देमाल पळविला

 
कन्हान १९ : – नत्थु उमरे यांचे शेतशिवार डुमरी खुर्द येथे  भरदिवसा घरात तीन युवकानी प्रवेश करून वृद्ध महिलेला घरात बंद करून अज्ञात चोरट्यांनी घरातील एकुण ५१ हजाराचा मुद्देमाल चोरुन नेल्याने कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
        मंगळवार (दि.१५) जुलै ली केसरबाई रामप्रसाद बसुलेपहाडे (६०) वर्ष रा. डुमरी (खुर्द) यांचा मुलगा सकाळी खदान येथे ड्युटीवर गेला होता. दुपारी जेवन करायला घरी येऊन पुन्हा ड्युटीवर गेला. केसरबाई डुमरी गावात जुने घरी गेली होती. आकाश शांताराम डोंगरे रा. डुमरी यांनी फोन करुन सांगितले की तु लव कर घरी ये, केसरबाई काही तरी घरी झाले असुन लवकर घरी पोहचली. तर तिची आई खिमयाबाई रडत होती. केसरबाई ने आईला काय झाले असे विचारले तर तिने सांगितले की घरी एकटी असतांना महामार्गा वरून तीन मुले दुचाकी वाहनाने घरी आले व घरात प्रवेश करुन आतुन दरवाजा बंद केला. चोरट्यांनी घरा त ठेवलेल्या डब्यातुन सोन्या, चांदिचे दागिने किंमत ४७,००० रुपये आणि नगदी ४,००० रुपये असा एकुण ५१,००० रुपयांचा मुद्देमाल चोरुन पळुन गेले. केसरबा ई बसुलेपहाडे यांचा तक्रारीवरून कन्हान पोलीसांनी अज्ञात आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करून पुढील तपास पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवधरे यांचा मार्गदर्शनात कन्हान पोलीस करित आहे.

Popular Articles