spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

खापा शहरात व परिसरात चोरांचा हैदोस, किराणा दुकानात चोरी

खापा :- स्थानिक बाजार चौकातील विठ्ठल रुक्मिणी मंदिर जवळील एका किराणा दुकानाचा कुलूप तोडून चोरी केल्याची घटना १२ डिसेंबरला पहाटे २ ते ४ वाजता दरम्यान घडली. यादरम्यान मूल्यवान वस्तूसह नगदी रक्कम व समान घेऊन पसार झाले. सकाळी परिसरातील नागरिक फिरायला निघाले तेव्हा ही घटना समोर आली. त्वरित स्थानिक लोकांनी दुकान मालक या यांना फोन करून माहिती दिली आणि दुकान मालक कृष्णा नारायण बारापात्रे दुकानावर आले. कृष्णा यांनी त्वरित पोलिसांना माहिती दिली.

मिळालेल्या माहितीनुसार फरियादी कृष्णा नारायण बारापात्रे यांची कृष्णा किराना स्टोअर नावाची दुकान बाजार चौक विठ्ठल रुक्मिणी मंदिर जवळ आहे. चोरांनी दुकानाच्या शटरचा कुलूप तोडून आत प्रवेश केला. चोरांनी शटर हा अर्धा उघडा करून दुकानातील सर्व सामान अस्तव्यस्त केले. दुकानाच्या गल्ल्यात असलेले रोख रक्कम नऊशे, दोन चांदीचे सिक्के आणि काजू चा डब्बा चोरून नेले. सकाळी ७ वाजता एएसआय नारायण बोरकर, खोमेश्वर बांबल यांनी घटनास्थळी पोहचून घटनेचा घटना पंचनामा केला. एकूण पंधरा ते वीस हजारांचा मुद्देमाल चोरीचा अंदाज आहे. त्याच रात्री कोथूरना मध्ये तीन ठिकाणी चोरीची माहिती समोर येते आहे.

Popular Articles