spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

चोरट्यांनी केली निवृत्त कामगाराच्या दुचाकीच्या डिक्कीतून रोकड लंपास, भरदिवसा सावनेर शहरात चोरीच्या घटनेत वाढ

खापा, वार्ताहर :- दुचाकीच्या डिक्कीतून रोकड लंपास झाल्याच्या वाढत्या घटनांमुळे नागरिकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे. अशा चोऱ्या सहसा बँकेतून पैसे काढल्यानंतर पाठलाग करून, किंवा दुचाकी पार्किंग केले असताना डिक्कीचे कुलूप तोडून केल्या जातात.

अशीच एक घटना शनिवार दि. १६ मे रोजी सावनेर बस स्थानकासमोरील श्रीयश बेकरी समोर घडली. दुकानासमोर उभ्या केलेल्या मोपेड दुचाकीच्या डिक्कीतून नव्यानव हजार रुपयांची रोकड चोरट्यांनी लंपास केल्याची घटना दुपारी साडे बारा वाजता सुमारास घडली.

पोलिस सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार समद नूरमोहम्मद शेख वय ६६ वर्ष असे नाव असून रा. जुना मटण मार्केट, खापा, ता. सावनेर येथील रहिवासी आहे.

समद हे एक डब्लू. सी. एल. चे पेन्शनधारक निवृत्त कामगार आहे. यांनी काही खाजगी कामासाठी स्टेट बँक ऑफ इंडिया, सावनेर शाखेतून दुपारी बारा वाजता दरम्यान नव्यानव हजार रुपये रोकड काढले आणि पासबुक, चेकबुकसह पन्नीमध्ये टाकून साडे बारा वाजता दरम्यान आपल्या मोपेड दुचाकीच्या डिक्कीत ठेवले. तेथून सावनेर बस स्थानकासमोरील श्रीयश बेकरीच्या समोर दुचाकी पार्क करून आईसक्रीम घेण्याकरिता गेले. तेथून खरेदी करून परत पावणे बारा वाजता सुमारास स्टेट बँक ऑफ इंडिया समोरील क्रिष्णा मेडिकल येथे औषधी घेण्याकरिता गेले. तिथे डिक्की उघडली असता, त्यामध्ये ठेवलेली पन्नी गायब होती, त्यावेळेस समद यांना कळले की आपण ठेवलेली रक्कम आणि पासबुक, चेकबुक ही चोरांनी चोरून नेली. त्यानंतर त्यांनी सावनेर पोलिस ठाणे गाठून तक्रार दिली. श्रीयश बेकरी येथील सी सी टी व्हि कॅमेरे तपासले असता, त्यात दोन अज्ञात व्यक्ती मोपेड दुचाकीची डिक्की तोडून त्यातून पन्नी घेऊन जातांनी दिसत आहे. यावरून अज्ञात व्यक्तींनी चोरी केल्याचे स्पष्ट झाले.

याप्रकरणी सावनेर पोलिसांद्वारे बी एन एस २०२३ कलम ३०३(२) नुसार अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पुढील तपास ठाणेदार ऋतुजा जाधव यांच्या मार्गदर्शनात पी एस आय बाळू राठोड करीत आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.