नागपूर :- विभागीय लोकशाही दिनात तीन तक्रारी दाखल झाल्या आहेत त्यापैकी एक तक्रारीचा निपटारा करण्यात आला. विभागीय आयुक्त कार्यालयात आज विभागीय लोकशाही दिनाचे आयोजन करण्यात आले होते, याप्रसंगी अपर आयुक्त प्रदीप कुलकर्णी यांनी तक्रारदारांच्या गाऱ्हानी स्विकारल्या.
जिल्हास्तरावर तक्रार अथवा निवेदन सादर केल्यानंतर समाधान न झाल्यास विभागीयस्तरावर आयोजित लोकशाही दिनात अशा तक्रारी संदर्भात निर्णय घेण्यात येतो. 
लोकशाही दिनात जिल्हाधिकारी नागपूर, महानगरपालिका आयुक्त व नागपूर सुधार प्रन्यास आदी कार्यालयाशी संबंधित प्रकरण दाखल झाले होते. विभागीय लोकशाही दिनात दाखल झालेल्या प्रकरणांपैकी एक प्रकरणचा निपटारा करण्यात आला आहे.






