spot_imgspot_img

Latest News

spot_img

Related Posts

‘पर्यटन स्थळ : एक अविस्मरणीय अनुभव”रीच टू अनरीच्ड’ कॉफी टेबल बुकचे राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या शुभहस्ते प्रकाशन

नागपूर :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठात ‘रीच टू अनरीच्ड’ संकल्पना अंतर्गत ‘पर्यटन स्थळ : एक अविस्मरणीय अनुभव’, कॉफी टेबल बुकचे माननीय राज्यपाल यांचे सचिव डॉ. प्रशांत नारनवरे यांच्या शुभहस्ते प्रकाशन करण्यात आले. जमनालाल बजाज प्रशासकीय भवनातील सभाकक्षात शनिवार, दि. २० सप्टेंबर २०२५ रोजी हा कार्यक्रम पार पडला.

या प्रसंगी कार्यकारी कुलगुरू डॉ. माधवी-खोडे चवरे, प्रभारी प्र-कुलगुरु डॉ. सुभाष कोंडावर, कुलसचिव डॉ. राजू हिवसे, राज्यपालनामित व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. समय बनसोड, राज्यपाल कार्यालयातील प्रबंधक  निशिकांत देशमुख, मानव्यविज्ञान विद्याशाखा अधिष्ठाता डॉ. शामराव कोरेटी, डॉ. अनंत पांडे, प्रवास व पर्यटन विभाग प्रमुख डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे, लोकप्रशासन विभाग प्रमुख डॉ. जितेंद्र वासनिक, विद्यार्थी विकास विभाग संचालक डॉक्टर विजय खंडाळ, डॉ. नीरज बोधी, राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठ शताब्दी महोत्सव समितीचे सदस्य उपस्थित होते. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या शताब्दी वर्षाच्या अनुषंगाने तत्कालीन कुलगुरू दिवंगत डॉ. सुभाष चौधरी यांनी ‘रीच टू अनरीच्ड’ संकल्पनेच्या माध्यमातून वि‌द्यापीठाच्या प्रवास व पर्यटन विभागाला विद्यापीठ कार्यक्षेत्रातील पर्यटन विकासाला चालना मिळावी म्हणून ऐतिहासिक स्थळे सुचीबध्द करण्याच्या सूचना दिल्या होत्या. समितीने नागपूर, वर्धा, गोंदिया, भंडारा जिल्ह्यांच्या काही पुरातात्विक, ऐतिहासिक आणि नैसर्गिक पर्यटन स्थळांना भेटी देउन छायाचित्र आणि पर्यटन स्थळांची माहिती या पुस्तकाच्या माध्यमातून सूचीबद्ध करण्याचे कार्य केले आहेत.

या कार्यक्रमाचे मुख्य उ‌द्दिष्ट पूर्व विदर्भातील जिल्ह्यांमध्ये स्थित पर्यटन स्थळांची माहिती सामान्य लोकांपर्यंत पोहोचवणे तथा पर्यटनाच्या माध्यमातून विदर्भातील या क्षेत्रांचा विकास करणे आहे. उपरोक्त जिल्ह्यांच्या पर्यटन स्थळांना लक्ष्यात ठेऊन वि‌द्यापीठाने शताब्दी वर्षामध्ये पूर्व विदर्भातील पर्यटन स्थळांच्या माहितीला संकलित करून कॉफी टेबल बुकच्या माध्यमातून प्रस्तूत करण्यात आले. यामध्ये पवनीचे प्राचीन बौद्ध स्तूप, पवनी किल्ला, मंदिर, गरुड स्तंभ, कचारगडच्या गुहा, आद्यऐतिहासिक निपाणी पिंपळगाव, तिलोता खैरी येथील शिळाप्रकोष्ठ, विरली खंदार येथील शिळावर्तुळ, भुयारी, भिवकुंडच्या ऐतिहासिक लेणी, कोलीतमारातील पुरावशेष, मनसर, रामटेक, नागरा येथील वाकाटक कालीन मंदिर, पवनार, मांढल येथील वाकाटककालीन शिल्प, वाकेश्वरचे कलचुरी मंदिर, भूगाव, पारशिवनी, नगरधन, ठाणेगाव, पोहणा, हिंगणघाट, रोहणी, तळेगाव, कापसी, गायमुख, नागरा येथील यादव कालीन मंदिर, प्रतापगड, सानगडी, अंबागड, नगरधन, येथील किल्ले, इत्यादी स्थळांचा समावेश करण्यात आला.

या कॉफी टेबल बुक निर्मिती करीता प्रवास व पर्यटन विभाग प्रमुख प्रा. डॉ. प्रियदर्शी खोब्रागडे, लोकप्रशासन विभाग प्रमुख डॉ. जितेंद्र वासनिक, डॉ. अमरदीप बारसागडे, श्री. परिमल सुरडकर, डॉ. अरविंद उपासनी, सौ. मंजुषा डोंगरे, श्री. मनोज वाहाणे व जनसंवाद विभागाचे चलचित्र व फोटोग्राफी करीता तांत्रिक सहाय्यक म्हणून श्री. निरज नखाते, श्री. राजू गायकवाड, आणि शताब्दी समिती सदस्य डॉ. अनंत पांडे, आणि डॉ. संतोष कसबेकर यांचा विशेष सहभाग होता.

Popular Articles