किशोर साहू, मौदा :- सध्या मौदा तालुक्यात गहू कापणी, मळणी व विक्रीला सुरुवात झालेली आहे. गव्हाचे समर्थन मूल्य 2570 प्रतिक्विंटल असून त्यापेक्षा कमी दराने तालुक्यातील व्यापारी वर्ग शेतकऱ्यांकडून 2100 ते 2200 प्रतिक्विंटल दराने खरेदी करत आहे. याबाबत निमखेडा येथील शिवसेनेचे तालुका सचिव विनायक महादुले, निमखेडा – चाचेर जि प सर्कलचे शिवसेनेचे भावी उमेदवार माजी सरपंच तथा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक प्रमोद बरबटे, विनायक घाटबांधे यांनी मौदा तहसीलदार यांना सोमवार ( ता.16 मार्च)ला तालुक्यातील व्यापारी वर्गाने शेतकऱ्याकडून शासनाने ठरवून दिलेल्या गहू पिकाचे समर्थन मूल्यापेक्षा कमी दराने गव्हाची खरेदी करू नये या प्रकारचे लेखी निवेदन दिले आहे.
व्यापाऱ्यांनी शेतकऱ्यांकडून गव्हाची खरेदी समर्थन मूल्य दराने करावी, मौदा तहसीलदारांना निवेदन









