spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

वाहतुक पोलीस यादवांच्या तत्परतेने वाचले हरिणाचे प्राण 

पोलिसांनी हरणाचा बचड्याला जिवनदान दिले
 
कन्हान ३० : –  कांद्री शेत शिवारातुन कुत्र्यांच्या व लोकां चा वरदडीतुन प्राण वाचवत मरघडे यांच्या गेटच्या आत आलेल्या हरिणाच्या पाळसाला वाहतुक पोलीसा नी संरक्षण देऊन वन विभागाच्या स्वाधिन करून त्याला जीवनदान दिले.
             सोमवार (दि.२८) जुलै ला सायंकाळी ४.३० वाजता  सात नंबर नाका कन्हान येथील सामाजिक कार्यकर्ते मनोज मरघडे यांचे घराच्या पंटगणात कांद्री शेत शिवारातुन कुत्र्यांच्या व लोकांचा वरदडीतुन प्राण वाचवत गेटच्या आत आले. स्थानिक नागरिकांनी वाह तुक पोलीस अधिकारी अनिल यादव यांना फोन करुन माहिती दिली. मुक्या प्राण्यांच्या मदतीसाठी पोलीस निरीक्षक वैजयंती मांडवधरे यांच्या मार्गदर्शनात अनि ल यादव, आकाश खोब्रागडे, सतिश तेलेवार घटनास्थ ळी धाव घेऊन लोकांची गर्दी कमी करून पारशिवनी येथील वन विभागाच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला व त्यांना ताबडतोब घटनास्थळी बोलाविले. तो पर्यंत हरणाचा बचड्यावर पाळत ठेवली. वन विभागाचे अधिकारी व चमु घटनास्थळी पोहोचुन हरिणाच्या पाळसाला रेस्कु करण्यात मदत करून त्याला सुख रूप त्यांचा स्वाधिन करण्यात यश आले. मात्र या दर म्यान सामाजिक कार्यकर्ते मनोज मरघडे यांनी देखिल हरणाला रेस्क्यु करण्यासाठी मदत करित असताना तरूण हरणाचा बचडा झटापट करत असतांना मरघडे यांचे डोक लोखंडी गेटला लागले, यात ते जख्मी झाले. वाहतुक पोलीस अधिकारी अनिल यादव यांनी लगेच तत्परता दाखवुन त्यांना उपचारासाठी खाजगी रुग्णा लयात दाखल करण्यात आले. आणि हरिण मात्र सुखरूप वनविभागाच्या स्वाधिन करण्यात आले. पोलिसांच्या सतर्कतेमुळे हरिणाचे प्राण वाचविल्याने पोलिसांच्या कार्याचे कौतुक सर्वत्र होत आहे.‌ मनोज मरघडे यांना लगेच उपचार मिळाल्याने कुटूंबातील लोकांनी पोलीसांचे आभार मानले.

Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.