spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

मराठी भाषा विभाग व अधीनस्थ कार्यालयांच्या संकेतस्थळांचे हस्तांतरण पूर्ण; नवी संकेतस्थळे नागरिकांच्या सेवेत पूर्ववत सुरू

नवी मुंबई :- महाराष्ट्र शासनाच्या मराठी भाषा विभागासह त्याच्या अधीनस्थ असणाऱ्या चार प्रमुख कार्यालयांच्या एकूण सात संकेतस्थळांचे MahaIT मार्फत हस्तांतरण आणि अद्ययावतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या मानक डोमेन संरचनेनुसार (maharashtra.gov.in) ही सर्व संकेतस्थळे आता नवीन डोमेनवर नियमितपणे कार्यान्वित करण्यात आली असून नागरिक, संशोधक, अभ्यासक आणि विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध झाली आहेत.

हस्तांतरणाच्या या तांत्रिक प्रक्रियेदरम्यान आवश्यक ते प्रणालीगत बदल करण्यात येत असल्याने ही संकेतस्थळे काही काळासाठी तात्पुरती अनुपलब्ध होती. मात्र, आता सर्व तांत्रिक प्रक्रिया यशस्वीरीत्या पार पडल्यामुळे ही संकेतस्थळे नव्या डोमेनसह पुन्हा सुरळीत सुरू झाली आहेत.

मराठी भाषा विभाग तसेच भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, राज्य मराठी विकास संस्था आणि महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळ या चार अधीनस्थ कार्यालयांच्या संकेतस्थळांचा यात समावेश आहे. शासनाच्या एकीकृत धोरणानुसार सर्व संकेतस्थळांना ‘maharashtra.gov.in’ ही मानक रचना लागू करण्यात आली आहे.

नवीन बदलानुसार मराठी भाषा विभागाचे मुख्य संकेतस्थळ आता https://marathi.maharashtra.gov.in या नवीन पत्यावर उपलब्ध आहे. यापूर्वी ते https://marathi.gov.in असे होते. भाषा संचालनालयाचे संकेतस्थळ पूर्वीच्या http://directorate.marathi.gov.in ऐवजी आता https://directorate-marathi.maharashtra.gov.in असे झाले आहे. राज्य मराठी विकास संस्थेचे संकेतस्थळ https://rmvs-marathi.maharashtra.gov.in तर महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळाचे संकेतस्थळ https://sahitya-marathi.maharashtra.gov.in या नव्या पत्यावर स्थलांतरित करण्यात आले आहे.

त्याचप्रमाणे, महाराष्ट्र राज्य विश्वकोश निर्मिती मंडळाचे अधिकृत संकेतस्थळ https://marathivishwakosh.maharashtra.gov.in असे अद्ययावत करण्यात आले आहे. विश्वकोश प्रथमावृत्ती (खंड १ ते २०) पाहण्यासाठी आता https://vishwakosh-marathi.maharashtra.gov.in या लिंकचा वापर करता येईल. याशिवाय, मराठी परिभाषा कोशासाठी https://shabdakosh-marathi.maharashtra.gov.in हे नवीन संकेतस्थळ निश्चित करण्यात आले आहे.

नागरिक, अभ्यासक, साहित्यिक, शोधार्थी, विद्यार्थी तसेच शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या बदललेल्या नवीन संकेतस्थळांची नोंद घेऊन त्यांचा वापर करावा, असे आवाहन मराठी भाषा विभागाचे सहसचिव डॉ. नामदेव भोसले यांच्यामार्फत करण्यात आले आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.