spot_imgspot_img

Top 5 This Week

spot_img

परिवहन मंत्री ना. प्रताप सरनाईक यांना आ.रवी राणा अध्यक्ष युवा स्वाभिमान पक्षाचे कडून विविध मागण्यांचे निवेदन

नागपूर :- राज्याचे परिवहन मंत्री नामदार प्रताप सरनाईक दि.०७ जून २०२६ रोजी अमरावती दौऱ्यावर आले असता, अध्यक्ष विधानसभा आश्वासन समितीचे आमदार रवी राणा जे युवा स्वाभिमान पक्षाचे अध्यक्ष आहेत यांचे खाजगी सचिव उमेश ढोणे यांनी त्यांना हॉटेल ग्रॅण्ड माहीफील येथे निवेदन दिले.

या निवेदनात एस.टी. कर्मचारी यांच्या विविध मागण्या तातडीने मान्य करण्यात याव्यात, तसेच त्यांच्या न्याय्य हक्कांसाठी शासनाने सकारात्मक निर्णय घ्यावा अशी मागणी करण्यात आली. सोबतच धारणी व अंजनगाव सुर्जी आगार डेपो बांधकाम करणे निधी मंजूर करण्यात यावे. ऋणनमोचंन बस हट ची व्यवस्था करणे.

या प्रसंगी उमेश ढोणे यांनी एस.टी. कर्मचाऱ्यांच्या समस्या आणि अपेक्षा स्पष्टपणे मांडल्या. मंत्री प्रताप सरनाईक यांनी निवेदन गांभीर्याने घेतले असून, संबंधित मागण्यांचा विचार करून योग्य ती कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले आहे.

ही घडामोड एस.टी. कर्मचाऱ्यांच्या मागण्यांच्या त्यांच्या प्रश्नांना तोडगा निघण्याची आशा व्यक्त केली जात आहे.


Click above on our news logo to access the Daily E_Newspaper.
For articles or advertisements, contact us at: dineshdamahe86@gmail.com.

Copyright Disclaimer: If Any Image, video or article belongs to its respective owner/creator. Full credit goes to the original creator. No copyright infringement intended.