नागपूर :- राणी दुर्गावती आदिवासी बहुउद्देशीय संस्था महाराष्ट्र राज्याच्या वतीने राज्यस्तरीय आदिवासी वधू-वर परिचय मेळावा तथा आदिवासी एकतेचे एकता महोत्सवाचे आयोजन सोमवारी 19 जानेवारी ला कविवर्य सुरेशभट सभागृह रेशीमबाग नागपूर येथे सकाळी ११ ते सायंकाळी ६ या दरम्यान, राज्यस्तरीय समस्त आदिवासी वधू-वर परिचय मेळावा व एकता महोत्सवाचे आयोजन करण्यात आलेले आहे. यावेळी या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याचे आदिवासी विकासमंत्री अशोक उईके यांची प्रामुख्याने उपस्थिती राहील. तसेच कार्यक्रमाचे अध्यक्ष चिमूर गडचिरोली येथील खासदार डॉ. नामदेव किरसान यांची उपस्थिती राहणार आहे. तरी या कार्यक्रमाला सर्व आदिवासी समाज बांधवांनी आपल्या कुटुंबासह उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेतर्फे करण्यात येत आहे. या कार्यक्रमाचे आयोजन राणी दुर्गावती बहुउद्देशीय संस्थेचे अध्यक्ष डॉ. प्रकाश शेडमाके, कृती समितीचे अध्यक्ष प्रदीप मसराम, कोषाध्यक्ष प्रशांत उईके आणि सहसचिव दशरथ मसराम तसेच दीपक कुलसुंगे, रतन कुमार टेकाम, मनोहर कोरेटीसह समस्त पदाधिकारी यावेळी परिश्रम घेत आहे.








